दिवाळी व निवडणुकीत नंदुरबार एस.टी. आगाराला दीड कोटींचे उत्पन्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2019 13:18 IST2019-11-03T13:18:36+5:302019-11-03T13:18:43+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : राज्य परिवहन महामंडळाच्या नंदुरबार आगारातर्फे दिवाळीनिमित्त सोडण्यात आलेल्या जादा गाडय़ांच्या माध्यमातून यंदा एक कोटी ...

दिवाळी व निवडणुकीत नंदुरबार एस.टी. आगाराला दीड कोटींचे उत्पन्न
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : राज्य परिवहन महामंडळाच्या नंदुरबार आगारातर्फे दिवाळीनिमित्त सोडण्यात आलेल्या जादा गाडय़ांच्या माध्यमातून यंदा एक कोटी 32 लाख इतके वाढीव उत्पन्न मिळाले. गेल्यावर्षाच्या तुलनेत यंदा 30 लाख रूपयांनी वाढ झाली. याशिवाय विधानसभा निवडणुकीनिमित्त प्रासंगीक करारासाठी देण्यात आलेल्या एस.टी. बसेसद्वारे सुमारे 14 लाख 40 हजार रुपये वाढीव उत्पन्न प्राप्त झाले.
25 ते 30 ऑक्टोबरदरम्यान दिवाळीनिमित्त नंदुरबार आगारातर्फे दैनंदिन बसेससोबत वाढीव जादा फे:यांचे नियोजन करण्यात आले होते. मागीलवर्षी 100 बसेसचे नियोजन होते. यंदा त्यात वाढ होऊन दिवाळीच्या 10 दिवसात 108 बसेस सोडण्यात आल्या. गेल्यावर्षी नंदुरबार आगारातर्फे तीन लाख 87 हजार किलोमीटर बसेस धावल्या. यात यंदा वाढ होऊन चार लाख 23 हजार किलोमीटर अंतर पार केले.
गेल्यावर्षीच्या दिवाळी हंगामात नंदुरबार आगारास एक कोटी दोन लाख रूपयांचे उत्पन्न प्राप्त झाले होते. तर यंदा दिवाळी हंगामानिमित्त एक कोटी 32 लाख रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले. मागीलवर्षी प्रती किलोमीटर 100.59 उत्पन्न मिळाले होते. यंदा त्यात वाढ होऊन 31.95 प्रती किलोमीटर उत्पन्न मिळाले. गेल्यावर्षी भारमान केवळ 47 होते तर यंदा भारमानात वाढ होऊन 55 झाले.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीनिमित्त जिल्हाभरात निवडणूक साहित्य, कर्मचारी, पोलीस यांच्या वाहतुकीसाठी विशेष बसेस प्रासंगीक करारावर देण्यात आल्या होत्या. 24 हजार किलोमीटर्पयत धावलेल्या बसेसच्या माध्यमातून नंदुरबार आगाराला 14 लाख 40 हजार रुपये वाढीव उत्पन्न मिळाले.