नंदुरबार : छाननीत १३ अर्ज वैध, ११ फेटाळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2019 12:27 IST2019-04-11T12:27:04+5:302019-04-11T12:27:20+5:30

नंदुरबार : उमेदवारी अर्जांच्या छाननीत १३ अर्ज वैध ठरविण्यात आले. भाजपतर्फे आमदार डॉ.विजयकुमार गावीत व डॉ.सुहास नटावदकर यांनी अर्ज ...

Nandurbar: Scrutiny 13 applications valid, 11 dismissed | नंदुरबार : छाननीत १३ अर्ज वैध, ११ फेटाळले

नंदुरबार : छाननीत १३ अर्ज वैध, ११ फेटाळले

नंदुरबार : उमेदवारी अर्जांच्या छाननीत १३ अर्ज वैध ठरविण्यात आले. भाजपतर्फे आमदार डॉ.विजयकुमार गावीत व डॉ.सुहास नटावदकर यांनी अर्ज केला होता. परंतु पक्षाचा एबी फॉर्म नसल्याने त्यांचा अर्ज बाद ठरविण्यात आला. नटावदकरांचा अपक्ष अर्ज मात्र कायम आहे. आता १२ एप्रिलच्या माघारीच्या मुदतीकडे लक्ष लागून आहे.
अर्ज दाखल करण्याच्या अंतिम मुदतीपर्यंत १४ उमेदवारांनी एकुण २४ अर्ज दाखल केले होते. बुधवारी सकाळी १० वाजता जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी बालाजी मंजुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत दाखल अर्जांची छाननी करण्यात आली. त्यात आमदार डॉ.विजयकुमार गावीत यांचा अर्ज अवैध ठरविण्यात आला. याशिवाय भाजपच्या उमेदवार डॉ.हिना गावीत यांनी भरलेला डमी आणि अपक्ष अर्ज, काँग्रेस उमेदवार अ‍ॅड.के.सी.पाडवी यांचा डमी व अपक्ष अर्ज, डॉ.सुहास नटावदकर यांनी भाजपतर्फे भरलेला अर्जही बाद करण्यात आला.
वैध ठरलेले अर्ज पुढील प्रमाणे : अ‍ॅड.के.सी.पाडवी (काँग्रेस), रेखा सुरेश देसाई बहुजन समाज पार्टी, हिना विजयकुमार गावीत (भाजप), सुशिल सुरेश अंतुर्लीकर (बहुजन वंचीत आघाडी), कृष्णा ठोगा गावीत (भारतीय ट्रायबल पार्टी), संदीप अभिमन्यू वळवी (बहुजन मुक्ती पार्टी), तर अपक्षांमध्ये अजय करमसिंग गावीत, अर्जूनसिंग दिवाणसिंग वसावे, अशोक दौलतसिंग पाडवी, आनंदा सुकलाल कोळी, डॉ.सुहास जयंत नटावदकर, हेमलता कागडा पाडवी व भरत जाल्या पावरा यांचा समावेश आहे.

Web Title: Nandurbar: Scrutiny 13 applications valid, 11 dismissed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.