नंदुरबारात तिघांचे अहवाल पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2020 13:34 IST2020-06-12T13:34:06+5:302020-06-12T13:34:30+5:30
नंदुरबार : शहरात आणखी तिघांचे रिपोर्ट पॉॅझिटिव्ह आले आहेत़ दरम्यान बहुचर्चित असलेल्या ‘त्या’ खानसाम्याचा दुसरा अहवालही पॉॅझिटिव्ह आला असल्याने ...

नंदुरबारात तिघांचे अहवाल पॉझिटिव्ह
नंदुरबार : शहरात आणखी तिघांचे रिपोर्ट पॉॅझिटिव्ह आले आहेत़ दरम्यान बहुचर्चित असलेल्या ‘त्या’ खानसाम्याचा दुसरा अहवालही पॉॅझिटिव्ह आला असल्याने एकच खळबळ उडाली आहे़
शहरातील राजीव गांधी नगरातील ३५ वर्षीय पुरुष मुंबई येथून परत आल्याची माहिती होती़ त्याचे स्वॅब तपासणीनंतर तो पॉझिटिव्ह आले़ सोबतच जिल्हा रुग्णालयातील २८ व ३० वर्षीय महिला कर्मचाऱ्यांचे स्वॅब रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत़ प्रशासनाने राजीव गांधी नगरात उपाययोजना केल्या असून बाधिताच्या संपर्कात आलेल्या चौघांना क्वारंटाईन केले आहे़ तीन अहवाल पॉझिटिव्ह असताना मेजवानी प्रकरणामुळे चर्चेत आलेल्या खानसाम्याचे स्वॅब रिपोर्ट दुसऱ्यांदा पॉझिटिव्ह आले़ जिल्हा रुग्णालयात आणि उपचार घेणाºयांची संख्या आता १४ झाली आहे़