नंदुरबारात दळण दळणाचे दर वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:10 IST2021-02-05T08:10:59+5:302021-02-05T08:10:59+5:30
शहर पीठ गिरणी सेवा संस्थेची सभा घेण्यात आली. अध्यक्षस्थानी श्यामकुमार चौधरी होते. त्यांनी एकीचे बळ ही कथा सांगून ...

नंदुरबारात दळण दळणाचे दर वाढले
शहर पीठ गिरणी सेवा संस्थेची सभा घेण्यात आली. अध्यक्षस्थानी श्यामकुमार चौधरी होते. त्यांनी एकीचे बळ ही कथा सांगून १ फेब्रुवारीपासून दळण दरात जी भाववाढ केली आहे त्यावर सर्व गिरणी मालकांनी ठाम रहावे. कोणीही कमी-जास्त भाव करू नये, असे सांगितले. सभेत नवीन दरपत्रकाच्या बॅनरचे अनावरणही करण्यात आले. सभेला संघटनेचे उपाध्यक्ष प्रताप जगताप, सहउपाध्यक्ष जिकर लोहिया, सचिव निशान चौधरी, खजिनदार विनोद पवार, सल्लागार चंद्रकांत बैरागी, नवलमल करडा, रशीदभाई, संचालक सुरेश चौधरी, संदीप चौधरी, भरत जगताप, वसंत सोनार व ७५ गिरणी मालक उपस्थित होते. या वेळी नवीन कार्यकारिणीतील नूतन सदस्यांच्या सत्कार करण्यात आला. गिरणी चालक-मालक यांच्या अडचणींसंदर्भात चर्चा करण्यात आली. काही अडचणी असल्यास एकत्रितरीत्या सोडविण्यातसंदर्भात सर्वसंमतीने मार्ग काढण्यात येईल, असे संघटनेच्या वतीने सांगण्यात आले.