नंदुरबारचा देशात ४४ वा क्रमांक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2020 12:08 IST2020-08-21T12:08:25+5:302020-08-21T12:08:33+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : स्वच्छ शहर स्पर्धेत नंदुरबार शहराने एक लाख लोकसंख्येच्या शहरांमध्ये देशात ४१ वा क्रमांक मिळविला ...

Nandurbar ranks 44th in the country | नंदुरबारचा देशात ४४ वा क्रमांक

नंदुरबारचा देशात ४४ वा क्रमांक

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : स्वच्छ शहर स्पर्धेत नंदुरबार शहराने एक लाख लोकसंख्येच्या शहरांमध्ये देशात ४१ वा क्रमांक मिळविला आहे. गेल्यावेळी नंदुरबार १२२ व्या क्रमांकावर आहे. राज्यात देखील नंदुरबारने मजल मारत १३ वा क्रमांक मिळविला आहे. शहादा पालिकेनेही आघाडी घेत ५० हजार लोकसंख्येच्या शहरांमध्ये पश्चिम झोनमध्ये १३ तर राज्यात देखील १३ क्रमांक मिळविला आहे. जिल्ह्यातील चारही पालिका आणि धडगाव नगरपंचायतीने यावेळी स्वच्छ शहरांच्या स्पर्धेत चांगली मजल मारली आहे.
केद्र सरकारने स्वच्छतेसाठी शहरांची स्पर्धा सुरू केली आहे. यासाठी लोकसंख्येच्या प्रकारानिहाय शहरांचे गट तयार करण्यात आले आहेत. याशिवाय झोन देखील तयार करण्यात आले आहेत. त्यानुसार वर्षभर करण्यात आलेल्या स्वच्छतेसंदर्भातील कामांच्या आधारे शहरांना रँकींग दिले जाते. त्या आधारे नंदुरबार गेल्या तीन ते चार वर्षांपासून सातत्याने प्रगती करीत आहे. यंदा शहादा शहराने देखील मोठी मजल मारली आहे.
स्वच्छ शहर स्पर्धेसाठी आॅनलाईन अ‍ॅप देखील विकसीत करण्यात आले आहे. त्या त्या शहरांमध्ये या अ‍ॅपच्या माध्यमातून नागरिकांच्या तक्रारी, सुचना विचारात घेऊन त्या सोडविण्यात येतात. याशिवाय स्वच्छतेच्या विविध बाबींचाही त्यासाठी आधार घेतला जातो. त्यात वैयक्तिक व सार्वजनिक शौचालयांची संख्या, हगणदारीमुक्त शहर, कचरा संकलन, कचऱ्यावरील प्रक्रिया यासह सार्वजनिक स्वच्छता यांचाही त्यात समावेश असतो. या कामांची पहाणी करण्यासाठी केंद्रीय समिती अचानक शहरांना भेटी देऊन त्यानुसार शहरांचे परिक्षण करीत असतात. त्या आधारे शहरांचे रँकींग ठरविले जात असते.
नंदुरबार शहरात वैयक्तिक शौचालयांची व सार्वजनिक शौचालयांची संख्या वाढविण्यात येऊन हगणदारीमुक्त शहर घोषीत करण्यात आले आहे. कचरा संकलनासाठी देखील ठेकेदार नेमून दररोज घरोघरी कचरा संकलन केले जाते. ओला, सुका कचरा आणि बायोमेडीकल वेस्टेजचीही विल्हेवाट शास्त्रीय पद्धतीने लावली जाते. नंदुरबार शहर अमृत योजनेत असल्यामुळे तो फायदाही पालिकेला झाला आहे. या सर्व कामांची दखल घेत पालिकेने थेट १२२ स्थानावरून ४१ व्या स्थानावर झेप घेतली आहे. देशात पालिका आता पहिल्या ५० शहरांमध्ये आली आहे.
शहादा पालिकेने देखील स्वच्छतेचे विविध उपक्रम राबविल्याने देशाच्या पश्चिम झोनमध्ये शहादा पालिका ७४ व्या स्थानावरून थेट १३ व्या स्थानावर आली आहे. झोनप्रमाणेच पालिका राज्यात देखील १३ व्या स्थानावर आहे.
तळोदा पालिका २५ ते ५० हजारा लोकसंख्येच्या गटात विभागात ६६ व्या तर राज्यात ४९ व्या स्थानावर, याच गटात नवापूर पालिका विभागात १०१ तर राज्य स्तरावर ७० व्या स्थानावर आहे. धडगाव नगरपंचायत याच गटात विभागात ३२८ तर राज्यात १५२ व्या स्थानावर आहे.


नंदुरबार पालिकेने स्वच्छ व सुंदर शहराला प्राधान्य दिले आहे. स्वच्छतेसाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. शहर हगणदारीमुक्त झाले आहे. कचरा संकलन, त्यावरील प्रक्रिया हे काम नियमितपणे केले जात आहे. पालिका निवडणुकीत शहर देशात १०० च्या आत आणण्याचा संकल्प केला होता. तो तडीस नेला याचे समाधान आहे. शहरवासीयांनी देखील त्यासाठी सहकार्य केले हे महत्त्वाचे आहे.
-रत्ना चंद्रकांत रघुवंशी,
नगराध्यक्षा, नंदुरबार.

Web Title: Nandurbar ranks 44th in the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.