ङोंडूचे दर पडल्याने नंदुरबारातील उत्पादक संकटात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2018 12:33 IST2018-10-06T12:33:29+5:302018-10-06T12:33:33+5:30

ङोंडूचे दर पडल्याने नंदुरबारातील उत्पादक संकटात
नंदुरबार : तालुक्यात किमान 50 हेक्टर क्षेत्रात ङोंडूची लागवड करण्यात आल्याचे कृषी विभागाने म्हटले आह़े सण-उत्सव काळासाठी महत्त्वपूर्ण ठरणारा हा ङोंडू नागरिकांच्या घराच्या शोभा वाढवत असला तरी त्याच्या विक्रीतून दोन वर्षात शेतक:यांना तोटाच आला होता़ यंदाही हीच स्थिती कायम असल्याने ङोंडू उत्पादक चिंतेत आहेत़ गणेशोत्सवापासून आवक होणारा ङोंडू व्यापारी नाममात्र किमतीत खरेदी करत आहेत़
नंदुरबार शहरातील माळीवाडा भागातील बहुतांश शेतकरी ङोंडू उत्पादन घेतात़ बिलाडी आणि धानोरा रोड भागात यंदाही ङोंडूची शेती बहरली आह़े रस्त्यालगतच्या शेतांमध्ये पिवळा आणि केशरी ङोंडूची फुले पाहून येणा:या जाणा:यांचे मन हरखून जात़े गेल्या 15 दिवसांपासून उत्पादनाला सुरुवात झालेला ङोंडू बाजार समितीत पाच ते सात रुपये दराने खरेदी करण्यात येत असल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत़ गेल्यावर्षाच्या तुलनेत यंदा खर्च वाढ झाल्याचे शेतक:यांचे म्हणणे आह़े गतवर्षार्पयत नर्सरीमधून तयारी रोपे आणून त्यांची लागवड करताना एकरी 16 ते 18 हजार रूपयांचा खर्च शेतक:यांना येत होता़ यंदा त्यात पाच हजाराने वाढ झाली आह़े नंदुरबार तालुक्याच्या पश्चिम पट्टय़ातील गावांमध्ये पाण्याच्या मुबलकतेवर ङोंडूची लागवड करण्यात येत़े बाजार समितीपेक्षा फुलविक्रेत्यांकडून तात्काळ खरेदी होत असल्याने बहुतांश शेतकरी या विक्रेत्यांना ङोंडू देऊन टाकतात़ यंदा बहरलेल्या ङोंडूत गोटी ङोंडू, गेंदा ङोंडू, पिवळा, केशरी यासह गावरान ङोंडूचा समावेश आह़े
काही वर्षापूर्वी कांदा आणि टमाटय़ासारख्या भाजीपाला पिकात आंतरपिक म्हणून ङोंडूची लागवड होत असल्याने त्याच्या दरांबाबत शेतक:यांमध्ये खास अशी उत्सुकता नव्हती़ कांदा बियाणे तयार करण्यासाठी अधिकप्रमाणात फुलातून परागी भवन व्हावे यासाठी तसेच ङोंडूच्या झाडातील मुळातून निघणा:या ऑक्सिजनमुळे टमाटय़ाच्या मूळाला गाठी येत नसल्याने शेतकरी त्याची लागवड करत होत़े परंतू गेल्या काही वर्षात सप्टेंबर ते नोव्हेंबर या कालखंडातील गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, दसरा, दिवाळी, कार्तिकी एकादशी या सणांना ङोंडूचा मोठय़ा प्रमाणावर वापर होऊ लागल्याने ङोंडूचे महत्त्व वाढलले आह़े यंदाही तीच स्थिती कायम आह़े उत्पन्न येत असलेला ङोंडू बाजार समितीत अल्प दरांमध्ये असला तरी फुलविक्रेत्यांकडे मात्र तो 35 ते 40 रूपये किलो दरात उपलब्ध आहेत़ दरांमध्ये वाढ होण्याची अपेक्षा शेतक:यांना आह़े