नंदुरबारात विवाहितेची बाथरुममध्ये जाळून घेत आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2018 12:19 IST2018-09-15T12:19:27+5:302018-09-15T12:19:39+5:30

In Nandurbar, a married man burnt his wife in a bathroom | नंदुरबारात विवाहितेची बाथरुममध्ये जाळून घेत आत्महत्या

नंदुरबारात विवाहितेची बाथरुममध्ये जाळून घेत आत्महत्या

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : कोकणीहिल भागातील देवमोगरा कॉलनीत राहणा:या 24 वर्षीय विवाहितेने बाथरुममध्ये जाळून घेत आत्महत्या केल्याची घटना 13 रोजी घडली. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. याबाबत शहर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
अश्विनी सुनील भोये (24) रा.कोकणीहिल, नंदुरबार असे मयत महिलेचे नाव आहे. 13 रोजी सकाळी अश्निनी यांनी बाथरूममध्ये स्वत: च्या अंगावर रॉकेल टाकून जाळून घेतले. घरच्या लोकांना ही बाब समजल्यावर दरवाजा तोडून तिला वाचविण्याचा प्रय} करण्यात आला. गंभीर भाजलेल्या अवस्थेत महिलेला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तेथे उपचार सुरू असतांना मध्यरात्री महिलेचा मृत्यू झाला. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. याबाबत नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास हवालदार सोनवणे करीत आहे.

Web Title: In Nandurbar, a married man burnt his wife in a bathroom