शहरं
Join us  
Trending Stories
1
चांदी २०% प्रीमियमवरही मिळेना; ऑनलाइन भाव अडीच लाखांवर
2
गुजरातमध्ये भाजपचे धक्कातंत्र; सर्वच्या सर्व १६ मंत्र्यांचे राजीनामे
3
मतपत्रिकांचा पर्याय आहे पण; आयोगाकडे मतपेट्याच नाहीत, युती सरकारनेच केली होती तरतूद
4
देशभर ऑनलाइन जुगारावर बंदी घालण्याची मागणी; सर्वोच्च न्यायालयात आज जनहित याचिकेवर सुनावणी 
5
ट्रम्प म्हणाले, ब्रेकिंग न्यूज देऊ का? रशियाचे तेल घेणे भारत थांबवणार   
6
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी आम्हाला पुरेसे मनुष्यबळ द्या!
7
रेल्वे प्लॅटफॉर्मवर व्हिडीओ कॉलवरून केली प्रसूती; थ्री इडियट्ससारखा चमत्कार
8
मालकाच्या मृत्यूनंतर नऊ दिवस लोटले, कुत्रा स्मशानभूमीतच थांबून...
9
देशात शिक्षण, परदेशात सेवा! टॉप-१०० आयआयटीयनपैकी ६२ जणांचा परदेशी ओढा
10
अमेरिकेत रिपोर्टिंगवर निर्बंध; पत्रकारांनी सोडले पेंटागॉन, ॲक्सेस बॅज केले परत 
11
‘एनडीए’चे २३७ उमेदवार जाहीर; प्रचाराला चढला रंग
12
सलग दुसऱ्या सेंच्युरीसह एलिसा हीलीनं पा़डला बांगलादेशचा बुक्का; ऑस्ट्रेलियाला मिळालं सेमीचं पहिलं तिकीट
13
Gujarat Cabinet Resignation: भाजपने गुजरातमधील सर्व मंत्र्यांचे राजीनामे का घेतले, आता पुढे काय घडणार?
14
टी-२० विश्वचषक २०२६ साठी पात्र ठरलेले सर्व २० संघ कोणते? येथे पाहा संपूर्ण यादी
15
वापरली अशी ट्रिक आणि दोन वर्षे फ्रीमध्ये ऑनलाइन ऑर्डर केलं जेवण, बिंग फुटताच...   
16
"इज्जत गेली गावाची, मग आठवण आली भावाची" एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
17
कुंभमेळा आयोजनाची कामं नियोजित वेळेत पूर्ण झाली पाहिजेत; मुख्य सचिव राजेश कुमारांचे निर्देश
18
VIDEO: बापरे !! महाकाय अजगराने महिलेच्या पायाला घातला विळखा, महिलेचे धाडस पाहून सारे थक्क
19
Kaps Cafe Firing: कपिल शर्माच्या कॅफेवर पुन्हा गोळीबार; बिश्नोई टोळीच्या गोल्डी-सिद्धूने घेतली हल्ल्याची जबाबदारी
20
‘गर्भवती असाल तर सुट्टी घ्या, पैसे कमावण्यासाठी येता आणि बैठकीला अनुपस्थित राहता” महिला अधिकाऱ्यावर काँग्रेसचे आमदार भडकले

भाजपाच्या हीना गावित यांना मोठी आघाडी, कॉँग्रेस उमेदवार पिछाडीवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2019 12:34 IST

Nandurbar Lok Sabha Election Results 2019: काँग्रेसचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या नंदुरबार लोकसभा मतदारसंघात भाजपाच्या डॉ. हिना गावित आणि काँग्रेसच्या अ‍ॅड. के.सी. पाडवी यांच्यात मुख्य लढत होत आहे.

नंदुरबार - नंदुरबारलोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवार डॉ़ हिना गावीत यांनी चांगलीच मुसंडी मारली आहे़. त्यांनी तब्बल 40 हजार 607 मतांची आघाडी घेतली आहे. अ‍ॅड़ के़सी़ पाडवी यांना 3 लाख 54 हजार 695 तर डॉ़ हिना गावीत यांना 3 लाख 95 हजार 303 इतकी मत मिळाली आहेत. एकूण २७ फेऱ्या होणार आहेत़ दरम्यान, सकाळी 8 वाजेपासून सुरुवातीला टपाली मतदान प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली होती. सातव्या फेरीपर्यंत दुपारी 12 वाजेपर्यंतची ही निकालाची आकडेवारी आहे.

काँग्रेसचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या नंदुरबार लोकसभा मतदारसंघात भाजपाच्या डॉ. हिना गावित आणि काँग्रेसच्या अ‍ॅड. के.सी. पाडवी यांच्यात मुख्य लढत होत आहे. 1951 पासून 2014 पर्र्यंत या मतदारसंघात काँग्रेसचाच उमेदवार विजयी झाला आहे. तर, गतवर्र्षीच्या म्हणजेच 2014च्या निवडणुकीत पहिल्यांदाच कमळ उमललंल होतं. या यशाची पुनरावृत्ती डॉ. हिना गावित करतात, की के सी पाडवी .काँग्रेसला पुन्हा अच्छे दिन दाखवतात, याबद्दल उत्सुकता आहे.

पहिल्या टप्प्यात पार पडललेल्या विदर्भातील नंदुरबार लोकसभा मतदारसंघात डॉ. हिना गावित यांच्या उमेदवारीकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. हिना गावित आणि अ‍ॅड. केसी पाडवी यांच्यातील मुख्य लढतीत नंदुरबारमध्ये कोण गुलाल उधळणार याची उत्सुकता महाराष्ट्रातील जनतेला लागली आहे. पहिल्या फेरीनंतर अ‍ॅड.केसी पाडवी यांनी आघाडी घेतली होती.त्यामुळे हिना गावित यांची सीट धोक्यात असल्याच मानन्यात येत होते. गेल्या निवडणुकीत हिना गावित यांनी 5 लाख 79 हजार 486 मतं घेत विजय मिळवला होता. मात्र, काही वेळातच चित्र बदलल्याचे दिसून येत आहे. गावित यांना पहिल्या फेरीतील पिछाडीनंतर पुन्हा मोठी आघाडी मिळाली आहे. जवळपास 40 हजार मतांनी आघाडी घेत हीना गवीत पुन्हा एकदा खासदार बनण्याकडे वाटचाल करताना दिसत आहेत. दरम्यान, नंदुरबार मतदारसंघात एकूण 18 लाख 70 हजार 117 मतदार असून नंदुरबारमध्ये 68.33 टक्के मतदान झाले आहे. नंदुरबार येथील खोडाई माता रस्त्यावरील वाहतूक इतरत्र वळविण्यात आली होती. मतदान केंद्रावर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे़. 

टॅग्स :nandurbar-pcनंदुरबारlok sabhaलोकसभाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Maharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019