नंदुरबारात ‘ऑक्टोबर हिट’चा जाणवतोय तडाखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2018 11:22 IST2018-10-08T11:21:57+5:302018-10-08T11:22:03+5:30

तापमानात वाढ : शहाद्यात तुरळक पाऊस, बुधवार व गुरुवार पावसाचा जोर वाढणार

Nandurbar hit 'October hit' | नंदुरबारात ‘ऑक्टोबर हिट’चा जाणवतोय तडाखा

नंदुरबारात ‘ऑक्टोबर हिट’चा जाणवतोय तडाखा

नंदुरबार : नंदुरबारात गेल्या आठवडाभरापासून ‘ऑक्टोबर हिट’चा तडाखा जाणवत आह़े रविवारी नंदुरबारात 39 अंश सेल्शिअस तापमानाची नोंद करण्यात आली़ उन्हाळ्यासारखे उन्ह पडत असल्याने दुपारच्या वेळी वर्दळीच्या रस्त्यांवर अघोषित संचारबंदीची स्थिती निर्माण झालेली आह़े  परतीच्या पावसाचे नुसते वातावरणसुध्दा तयार झाले नसल्याने सर्वसामान्यांकडून चिंता व्यक्त करण्यात येत आह़े
‘ऑक्टोबर हिट’ असल्याने नंदुरबार सध्या ‘हॉट सिटी’ ठरत आह़े दुपारच्या वेळी कडाक्याच्या उन्हाचा सामना सर्वसामान्यांना करावा लागत आह़े ‘आयएमडी’ने सांगितल्यानुसार 10 ऑक्टोबरपासून तापमानात काही अंशी घट होऊन परतीच्या पावसाचा प्रभाव वाढणार आह़े तसेच ‘स्कायमेट’ने वर्तविलेल्या अंदाजानुसार 10 व 11 ऑक्टोबरदरम्यान पावसाळी वातावरण राहणार आह़े तुरळक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी कोसळणार असल्याचे सांगण्यात आल़े दरम्यान, रविवारी नंदुरबारात तब्बल 39 अंश सेल्शिअस तापमानाची नोंद करण्यात आली़ त्यामुळे पावसाळ्यात उन्हाळा परतलाय की काय? अशी स्थिती निर्माण झालेली आह़े दुपारच्या वेळी तापमानात प्रचंड वाढ होऊन सोबतीला आद्रतेताही चांगलीच जाणवत आह़े त्यामुळे उन्हाळा गेल्यावर अळगळीत ठेवलेले कुलर नागरिकांकडून पुन्हा कार्यान्वित करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले आह़े 
जिल्ह्यात यंदा केवळ 67 टक्के इतक्याच पजर्न्यमानाची नोंद करण्यात आली आह़े त्यातच ऑक्टोबर हिट जाणवत असल्याने पिकांची स्थिती चिंताजनक झालेली आह़े वाढत्या तापमानामुळे पिक माना टाकत असल्याचे शेतक:यांकडून सांगण्यात येत आह़े त्यातच पावसाचीही कृपा होत नसल्याने निसर्गाच्या दुहेरी संकटाला शेतक:यांसह सर्वसामान्य नागरिकांना सामोरे जावे लागत आह़े दरवर्षी ऑक्टोबर हिटचा नंदुरबार जिल्ह्यात चांगला प्रभाव जाणवत असतो़ यंदा उन्हाळी दिवसांमध्ये नंदुरबारचे तापमान 44 ते 45 अंशार्पयत जावून पोहचले हहोत़े त्यातच आता ऑक्टोबर हिटमध्येही तापमान चाळीशी जवळ येऊन पोहचले आह़े त्यामुळे सर्वाकडूनच पावसाची आतूर्तेने वाट पाहिली जात आह़े
दरम्यान, स्कायमेट या हवामान संस्थेकडून मिळालेल्या माहितीनुसार बुधवार व गुरुवार नंदुरबारसह उत्तर महाराष्ट्रात पावसाचा अंदाज आह़े त्याच बरोबर शनिवारी शहादा तालुक्यातील सारंगखेडा, बामखेडा, कौठल, वडाळी, कळंबू आदी परिसरात तुरळक ठिकाणी 15 ते 20 मिनीट पावसाच्या सरी कोसळल्या होत्या़ त्यामुळे येत्या काही दिवसात तापमान कमी होऊन पावसाची शक्यता वर्तविण्यात येत आह़े पावसाच्या आगमनाने पिकांना फारसा काही फायदा होणार नसल्याचे म्हटले जात आह़े परतीचा पाऊस चांगला बरसला तर याचा फायदा जलस्त्रोतांमध्ये वाढ होण्यास नक्कीच होणार असल्याचे सांगण्यात येत आह़े 
 

Web Title: Nandurbar hit 'October hit'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.