शहरं
Join us  
Trending Stories
1
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
2
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
3
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
4
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
5
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
6
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
7
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
8
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
9
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
10
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
11
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
12
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
13
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
14
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
15
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
16
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
17
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
18
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
19
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
20
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत

जिल्ह्यात पावसाची संततधार कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2017 12:59 AM

   शहाद्यात शेतीपिकांचे नुकसान : पाणीपातळीत वाढ, कुढावदला घर जमीनदोस्त, जीवितहानी टळली

ठळक मुद्देपावसाची रिपरिप कायमसंततधार पावसाने कुढावद येथे घर कोसळलेब्राह्मणपुरीत शेतांमध्ये साचले पाणी

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : नंदुरबार शहरासह जिल्ह्यात सर्वत्र गुरुवारी पावसाची रिपरिप कायम होती़ पावसाच्या संततधारेने शहरी तसेच ग्रामीण भागातील जनजीवनही काहीसे विस्कळीत झाले होते़ गेल्या आठवड्यापासून जिल्ह्यात   अक्कलकुवा, शहादा, तळोदा, नवापूर नंदुरबार तालुका आदी ठिकाणी पावसाची संततधार कायम आहे़ त्यामुळे शेतकºयांमध्येही आनंदाचे वातावरण आहे़ संततधार पावसामुळे शेतकºयांंची पिके तरली असली                तरी बहुसंख्य ठिकाणी शेतात पाणी साचल्याने पिकांचे नुकसानदेखील झाले असल्याची स्थिती आहे़ शहादा तालुक्यातील बहुसंख्य शेतशिवारात पाणी साचले आहे़

संततधार पावसाने कुढावद येथे घर कोसळलेशहादा तालुक्यातील कुढावद येथे गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या संततधार पावसामुळे मोठ्या संख्येने घरांची पडझड सुरू आहे़ अतिपावसामुळे कुढावद येथील सखाराम दगडू बोराणे यांचे घर कोसळले आहे़ सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झालेली नाही़ परंतु यात त्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले असल्याचे सांगण्यात आले आहे़ घरातील संसारोपयोगी वस्तू घराच्या ढिगाºयाखाली दबल्या गेल्याने भरपावसात त्यांचा संसार उघड्यावर आला आहे़ ज्या वेळी त्यांचे घर कोसळले त्या वेळी ते पूजेनिमित्त मंदिरात गेले होेते़ त्यामुळे मोठी दुर्घटना टळली़ या घटनेत आर्थिक नुकसान झाले असल्याने शासनाकडून नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी बोराणे यांच्याकडून करण्यात येत आहे़ या परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून पावसाची संततधार कायम असल्याने अनेक  घरे कोसळण्याच्या प्रकारात वाढ होत आहे़ अनेक भागातील घरांना तडे जात असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे़