नंदुरबार जिल्ह्याचा साडेतीनशे कोटी रुपयांच्या वार्षिक आराखड्यास मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:10 IST2021-02-05T08:10:44+5:302021-02-05T08:10:44+5:30
आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. के.सी. पाडवी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली. बैठकीत ...

नंदुरबार जिल्ह्याचा साडेतीनशे कोटी रुपयांच्या वार्षिक आराखड्यास मंजुरी
आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. के.सी. पाडवी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली. बैठकीत २०२१-२०२२ या वर्षासाठी ३५० कोटी ७४ लाख रुपयांच्या आराखड्यास मान्यता देण्यात आली. हा आराखडा मान्यतेसाठी राज्यस्तरीय समितीकडे पाठविण्यात येणार आहे.
बैठकीस खासदार डॉ. हीना गावीत, जि.प. अध्यक्षा ॲड. सीमा वळवी, आमदार डॉ.विजयकुमार गावीत, शिरीषकुमार नाईक, राजेश पाडवी, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, जिल्हा नियोजन अधिकारी चौधरी आदी उपस्थित होते.
बैठकीत चालू आर्थिक वर्षामधील खर्चाचा आढावा घेण्यात आला. सर्वसाधारण योजनेअंतर्गत ११५ कोटीपैकी १८ कोटी ३३ लाख, आदिवासी उपयोजना २९३ कोटी ३७ लाखापैकी ५३ कोटी ८३ लक्ष खर्च झाला असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. कोविड-१९ आणि ग्रामपंचायत निवडणूकांमुळे खर्च कमी झाल्याने आगामी काळात १०० टक्के खर्च करण्याचे निर्देश पालकमंत्री पाडवी यांनी दिले.