नंदुरबार जि.प.सीईओ मंगळे यांची 14 महिन्यातच बदली

By Admin | Updated: June 8, 2017 15:57 IST2017-06-08T15:57:59+5:302017-06-08T15:57:59+5:30

रवींद्र बिनवाडे नंदुरबारचे नवीन सीईओ

Nandurbar District P.e.e.e.o. changed its tally to 14 months | नंदुरबार जि.प.सीईओ मंगळे यांची 14 महिन्यातच बदली

नंदुरबार जि.प.सीईओ मंगळे यांची 14 महिन्यातच बदली

ऑनलाईन लोकमत

नंदुरबार,दि.8 : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जी.सी.मंगळे यांची नगर महापालिका आयुक्तपदी बदली झाली असून त्यांच्या जागी नगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र बिनवाडे यांची नियुक्ती झाली आहे. मंगळे यांची अवघ्या 14 महिन्यातच बदली झाली आहे. 
जी.सी.मंगळे हे एप्रिल 2016 मध्ये नंदुरबार जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून आले होते. 14 महिन्याच्या कालावधीत त्यांनी जिल्हा परिषदेच्या कामकाजाला शिस्त लावली होती. घरकुलांची ऑनलाईन कामे सर्वाधिक त्यांच्या काळात झाली. विविध आंदोलने देखील त्यांनी सहजपणे हाताळत चिघळू दिले नाहीत. त्यांच्या बदलीचे आदेश बुधवारी दुपारी जिल्हा परिषदेला प्राप्त झाले. 
मंगळे यांच्या जागी नगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र बिनवाडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बिनवाडे हे 2012 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहे. पुढील आठवडय़ात ते रुजू होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

Web Title: Nandurbar District P.e.e.e.o. changed its tally to 14 months