नंदुरबार जिल्ह्यात पारा घसरला, थंडीचे प्रमाण वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:29 IST2021-02-07T04:29:29+5:302021-02-07T04:29:29+5:30
नंदुरबार : जिल्ह्यात पारा पुन्हा घसरला असून थंडीचे प्रमाण वाढले आहे. शुक्रवारी रात्री ते शनिवारी सकाळी किमान तापमान १२ ...

नंदुरबार जिल्ह्यात पारा घसरला, थंडीचे प्रमाण वाढले
नंदुरबार : जिल्ह्यात पारा पुन्हा घसरला असून थंडीचे प्रमाण वाढले आहे. शुक्रवारी रात्री ते शनिवारी सकाळी किमान तापमान १२ अंशापर्यंत घसरले होते. वाढत्य थंडीमुळे रब्बी पिकांना त्याचा फायदा होणार असल्याचे चित्र आहे.
जिल्ह्यात मध्यंतरी थंडीचे प्रमाण कमी झाले होते. किमान तापमान १८ ते २१ अंशापर्यंत वाढले होते. परंतु दोन ते तीन दिवसांपासून पुन्हा थंडी वाढली आहे. त्यामुळे किमान तापमान १२ ते १४ अंशापर्यंत जात आहे. कमाल तापमान ३२ ते ३४ अशांपर्यंत राहत आहे. आणखी काही दिवस थंडीचे प्रमाण कायम राहणार असून त्यानंतर मात्र तापमान वाढण्यास सुरुवात होणार आहे. येत्या महिनाभर हवामान शुष्क राहणार असून पावसाचा अंदाज नसल्याचेही हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.