नंदुरबार जिल्ह्यात एकाच दिवसात ३८ जणांना कोरोना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2020 07:44 PM2020-06-25T19:44:34+5:302020-06-26T12:17:41+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : एकाच दिवसात ३८ जण कोरोना पॉझिटिव्ह आल्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. यातील सर्वाधिक अर्थात ...

In Nandurbar district, 38 people were killed in a single day | नंदुरबार जिल्ह्यात एकाच दिवसात ३८ जणांना कोरोना

नंदुरबार जिल्ह्यात एकाच दिवसात ३८ जणांना कोरोना

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : एकाच दिवसात ३८ जण कोरोना पॉझिटिव्ह आल्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. यातील सर्वाधिक अर्थात २९ जण नंदुरबार शहरासह तालुक्यातील आहेत तर उर्वरित जिल्हा रुग्णालय, तळोदा व शहादा येथील आहेत. आजच्या पॉझिटिव्ह संख्यमुळे कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या १४५ झाली आहे. यापूर्वी ६ जणांचा मृत्यू झाला असून ५२ जण कोरोनामुक्त झाले आहेत.
जिल्ह्यातील कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. गुरुवारी तब्बल ३८ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे जिल्ह्यात पुन्हा चिंतेचे वातावरण आहे. विशेषत: नंदुरबार शहरातील रुग्ण संख्या आटोक्यात येत नसल्याची स्थिती आहे.
धुळे येथील वैद्यकीय महाविद्यालयातून गुरुवारी सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालानुसार नंदुरबार शहरात २९, शहादा २, तळोदा २ तर जिल्हा सामान्य रुग्णालयातील पाच कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे दर्शवण्यात आले आहे़ आजवरचा हा सर्वात मोठा आकडा आहे़
शहादा शहरात गणेश नगर भागातील दोघांना कोरोनाची लागण झाली आहे़ तळोदा येथील मिरा कॉलनीत दोघे कोरोना बाधित आहेत़ दोघेही खाजगी दवाखान्यात उपचार घेण्यासाठी गेल्याचे समजते़ जिल्हा रुग्णालयात पाच कर्मचाऱ्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे़ यात चार कर्मचारी हे जिल्हा रुग्णालयाचे कर्मचारी असून एक कर्मचारी जमाना ता़ अक्कलकुवा येथून डेप्युटेशनवर आलेला होता़ त्यालाही लागण झाल्याची माहिती आहे़ मंगळबाजार परिसरात, गिरीविहार, सैताणे, शहादा येथील बाधित हे आधीपासून क्वारंटाईन आहेत़ तर तळोदा दोघांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे़
एकाच दिवशी प्राप्त झालेल्या या अहवालांमुळे एकच खळबळ उडाली आहे़ येथील गणेशनगर भागातील २९ वर्षीय कोरोना विषाणू बाधीत रुग्णवाहिकेच्या चालकाचे २ नातेवाईक कोरोना विषाणू बाधित असल्याचा अहवाल प्राप्त झाला असून या भागातील तिन बाधित रुग्णांवर नंदुरबार जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
शहाद्यात पुन्हा दोन
गणेशनगर भागातील १०८ रुग्णवाहिका वरील चालक कोरोना विषाणू बाधित असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर प्रशासनाने त्याच्या कुटुंबातील व जवळच्या संपर्कातील ८ व्यक्तींना विलगीकृत करण्यासह त्यांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले होते.
आज यासर्व आठ नागरिकांचे अहवाल प्रशासनाला प्राप्त झाले असून बाधित रुग्णवाहिका चालकाच्या दोन नातेवाईकांचा अहवाल हा पॉझिटिव्ह आला असून उर्वरित सहा नागरिकांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
बाधित रुग्णवाहिका चालक हा गेल्या आठवड्यात एका डॉक्टर सोबत नाशिक येथे गेला होता तेथून परतल्यानंतर त्याला कोरोनाविषाणू सदृश्य लक्षणे आढळून आल्याने प्रशासनाने त्यास लागलीच विलगीकरण कक्षात दाखल केले होते.
तीन दिवसानंतर सदर चालकाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने प्रशासनाने संपूर्ण गणेशनगर भागातील परिसराला कंटेनमेंट म्हणून घोषित केले असून यामधील अनेक वसाहती सील केले आहेत.
नवीन प्रतिबंधात्मक क्षेत्रातील नागरिकांच्या आरोग्य तपासणी साठी ८ वैद्यकीय पथकांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती प्रांत अधिकारी डॉ. चेतन गिरासे यांनी दिली.


नंदुरबार शहरात आढळून आलेल्या २९ रुग्णांपैकी १० जण मंगळ बाजार परिसर, ८ जण गिरीविहार कॉलनी, २ ज्ञानदीप सोसायटी, २ कोकणी हिल तर नंदुरबार तालुक्यातील सैताणे येथे पाच जणांना कोरोनाची बाधा झाली आहे़ सुरत येथील एक जण सैताणे आणि नंदुरबार शहरात येऊन गेला होता़ त्याच्या संपर्कात आलेल्या ७ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे़ यातील दोघे ज्ञानदीप सोसायटी नंदुरबार तर सात जण हे सैताणे गावातील आहेत़


द्वारदर्शन पडले अनेकांना महागात
मंगळबाजारातील सिद्धीविनायक चौकातील महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळली होती. या महिलेच्या संपर्कातील १० जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. शिवाय येथीलच कनेक्शन जिल्हा परिषदेतील बांधकाम विभागात देखील असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे गुरुवारी जिल्हा परिषदेतही चलबिचलता निर्माण झाली होती. एवढ्या संख्येने रुग्ण आढळल्याने मंगळ बाजार आणि सिद्धी विनायक चौक भागात विशेष दक्षता घेतली आहे. नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: In Nandurbar district, 38 people were killed in a single day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.