नंदुरबारातील व्यापा:याकडून 18 लाखांच्या खंडणीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2018 13:36 IST2018-07-05T13:35:55+5:302018-07-05T13:36:02+5:30

Nandurbar Business: Demand for Rs 18 lakhs | नंदुरबारातील व्यापा:याकडून 18 लाखांच्या खंडणीची मागणी

नंदुरबारातील व्यापा:याकडून 18 लाखांच्या खंडणीची मागणी

नंदुरबार : शहरातील व्यापा:याला दोघा अज्ञात व्यक्तींनी धमकावून त्यांच्याकडून 18 लाख रूपयांच्या खंडणीची मागणी केल्याचा प्रकार उघडकीस आला आह़े या प्रकाराने एकच खळबळ उडाली असून 2 जुलै रोजी अज्ञात मोबाईल क्रमांकावरून व्यापा:यास धमकावण्यात आले होत़े 
सुरेशकुमार रूपचंद जैन रा़ रूपाशेठ पार्क यांना 2 जुलै रोजी दोन अनोळखी मोबाईल क्रमांकावरून दोन अज्ञात व्यक्तीने संपर्क केला होता़ यातील एकाने नातेवाईकाचे खोटे नाव सांगून 18 लाख रूपयांची मागणी केली़ यावेळी सुरेशकुमार जैन यांनी नातेवाईकाचे नाव चुकीचे असल्याचे सांगिल्यावर फोनवरून बोलणा:या संशयिताने 18 लाख रूपये दे, अन्यथा मुलाला उचलून घेऊन जाईल अशी धमकी दिली़ यातून  घाबरलेल्या जैन यांनी तात्काळ उपनगर पोलीस ठाणे गाठून माहिती दिली़ जैन यांच्या फिर्यादीवरून दोघा अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सहायक पोलीस निरीक्षक बच्छाव करत आहेत़ 
सुरेशकुमार जैन हे सराफ व्यावसायिक आहेत़ पोलीसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर संबधित मोबाईल क्रमांकांची माहिती घेण्यास सुरूवात केली आह़े या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली असून प्रथमच खंडणी मागण्याचा प्रकार समोर आल्याचे सांगण्यात येत आह़े 
 

Web Title: Nandurbar Business: Demand for Rs 18 lakhs