ई-नाम प्रणालीत नंदुरबार बाजार समिती अव्वल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2019 11:49 IST2019-02-23T11:49:06+5:302019-02-23T11:49:37+5:30
नंदुरबार : आॅनलाईन राष्टÑीय कृषी बाजार अर्थात ई-नाम प्रणालीत उत्त्कृष्ट कामकाज केल्याने नंदुरबार बाजार समितीचा सहकार व पणन विभागातर्फे ...

ई-नाम प्रणालीत नंदुरबार बाजार समिती अव्वल
नंदुरबार : आॅनलाईन राष्टÑीय कृषी बाजार अर्थात ई-नाम प्रणालीत उत्त्कृष्ट कामकाज केल्याने नंदुरबार बाजार समितीचा सहकार व पणन विभागातर्फे गौरविण्यात येणार आहे. राज्यातील पाच बाजार समितींची निवड करण्यात आली आहे.
शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य भाव मिळावा, थेट त्यांच्या खात्यावर पैसे जमा व्हावे, मध्यस्थी व दलालांचा थेट-खरेदी विक्रीत सहभाग राहू नये यासाठी शासनाने आॅनलाईन राष्टÑीय कृषी बाजार अर्थात ई-नाम योजना २०१६ पासून लागू केली आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील ६० बाजार समित्यांमध्ये साडेनऊ लाख शेतकºयांची नोंदणी करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत तब्बल ४० लाख क्विंटल शेतमालाचा आॅनलाईन लिलाव देखील करण्यात आला आहे. या योजनेत मध्यस्थांशिवाय थेट शेतकºयांच्या बॅँक खात्यात एक हजार १०० कोटी रुपये जमा झाले आहेत.
नंदुरबार बाजार समितीने देखील गेल्या दोन वर्षांपासून ई-नाम प्रणाली सुरू केली आहे. याद्वारे शेतीमालाचा लिलाव सुटसुटीत आणि प्रभावी झाला आहे. परिणामी शेतकºयांना योग्य मोबदला देखील मिळत आहे. राज्यातील अशा प्रकारची योजना राबविणाºया बाजार समितींमध्ये नंदुरबार बाजार समितीने उत्कृष्ट काम केल आहे. त्याची दखल घेवून नंदुरबार बाजार समितीची निवड करण्यात आली आहे.
प्रथम क्रमांक परभणी, द्वितीय दौंड, तृतीय कोल्हापूर तर उत्तेजनार्थ वर्धा आणि नंदुरबार बाजार समितींचा समावेश आहे. पहिल्या चार बाजार समित्या मोठ्या आणि प्रगत शहरातील आहेत तर आदिवासी भागातील केवळ नंदुरबार बाजार समिती आहे.
२३ रोजी पुणे येथे एका कार्यक्रमात सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते या बाजार समितींना गौरविण्यात येणार आहे. आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली बाजार समितीचे सभापती देवमन पवार, उपसभापती हरिश्चंद्र पाटील, सचिव योगेश अमृतकर व सर्व संचालक मंडळांनी यासाठी प्रयत्न केले.