नंदुरबार : पाच निवडणुकांमध्ये २९ उमेदवारांनी अजमावले नशीब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2019 11:37 IST2019-04-05T11:37:09+5:302019-04-05T11:37:34+5:30
चार वेळा काँग्रेस तर एक वेळा भाजपचा विजय

नंदुरबार : पाच निवडणुकांमध्ये २९ उमेदवारांनी अजमावले नशीब
नंदुरबार : मतदार संघात गेल्या पाच निवडणुकीत एकुण २९ उमेदवारांनी आपले नशीब अजमले. त्यात आठ अपक्षांचा देखील समावेश आहे.
नंदुरबार लोकसभा मतदारसंघात १९९८ ते २०१६ पर्यंतच्या पाच निवडणुकीत काँग्रेस, भाजप, राष्टÑवादी, समाजवादी पार्टी यासह इतर पक्षांच्या उमेदवारांनी आपले नशीब अजमावले. पाच पैकी चार वेळा काँग्रेसचे माणिकराव गावीत तर एक वेळा भाजपच्या डॉ.हिना गावीत या विजयी झाल्या आहेत. १९९८ मधील निवडणुकीत एकुण पाच उमेदवार रिंगणात होते. मुख्य लढत काँग्रेसचे माणिकराव गावीत व भाजपचे कुवरसिंग वळवी यांच्यात मुख्य लढत होती. माणिकराव गावीत विजयी झाले. अवघ्या वर्षभरात अर्थात १९९९ मध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचे माणिकराव गावीत व भाजपचे कुवरसिंग वळवी यांच्यात लढत झाली. एकुण चार उमेदवार रिंगणात होते. यावेळी देखील माणिकराव गावीत विजयी झाले. २००४ मध्ये मध्ये एकुण पाच उमेदवार होते. लढत काँग्रेसचे माणिकराव गावीत व भाजपचे डॉ.सुहास नटावदकर यांच्यात रंगली. माणिकराव गावीत हे विजयी झाले.
२००९ मधील निवडणुकीत एकुण सात उमेदवार रिंगणात होते. यावेळी प्रथमच तिरंगी लढत रंगली. काँग्रेसचे माणिकराव गावीत, भाजपचे सुहास नटावदकर व समाजवादी पार्टीचे शरद गावीत यांच्यात लढत झाली. यावेळीही माणिकराव गावीत हे विजयी झाले. २०१४ मध्ये झालेल्या निवडणुकीत एकुण आठ उमेदवार रिंगणात होते. पैकी काँग्रेसचे माणिकराव गावीत व भाजपच्या डॉ.हिना विजयकुमार गावीत यांच्यात लढत रंगली. डॉ.हिना गावीत यांनी भाजपच्या माध्यमातून विजय मिळविला. मतदारसंघात प्रथमच काँग्रेसेतर उमेदवार विजयी झाला.