संचारबंदीमुळे थांबले नंदुरबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2020 12:41 IST2020-07-13T12:41:22+5:302020-07-13T12:41:29+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने दर रविवारी संचारबंदी लागू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ़ ...

संचारबंदीमुळे थांबले नंदुरबा
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने दर रविवारी संचारबंदी लागू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ़ भारुड यांनी दिले आहेत़ यांतर्गत संचारबंदीच्या पहिल्याच रविवारी शहर थांबल्याचे चित्र होते़ जागोजागी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असला तरी नागरिक स्वच्छेने घराबाहेर पडत नसल्याने हा प्रयोग यशस्वी ठरण्याची चिन्हे आहेत़
जिल्हाधिकारी यांनी काढलेल्या आदेशानंतर पोलीस आणि महसूल प्रशासन शनिवारपासूनच या संचारबंदीची तयारी करत होते़ यातून जागोजागी बॅरीकेड लावण्यासह बंदोबस्ताचे पॉर्इंट ठरवण्यात आले होते़ सकाळी ९ वाजेपासून संचारबंदी सुरू होणार असल्याने दुध, वृत्तपत्र आणि भाजीपाला विक्रेत्यांनी सकाळी ९ पूर्वी आपले वितरण पूर्ण करुन घेतले होते़ कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या या निर्णयाला नागरिकांनी स्वच्छेने पाठिंबा देत घराबाहेर पडणे टाळले होते़ शहरातील दवाखाने आणि औषधी विक्रीची दुकाने वळगता इतर एकही दुकान किंवा व्यवसाय सुरू नसल्याचे चित्र दिसून आले़ ग्रामीण भागातून येणारी वाहनेही बंद असल्याने रस्ते निर्जन झाले होते़ शहरात वाहनांना प्रवेशबंदी करण्यासाठी मुख्य रस्त्यावर जागोजागी वाहतूक शाखेचे कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते़
दरम्यान संचारबंदी असली तरीही काहींना शहरात फेरफटका मारण्याचा मोह आवरला गेला नव्हता़ अशा उत्साहींवर कारवाईसाठी शहर वाहतूक शाखेने पथकांची निर्मिती केली होती़ यांतर्गत दिवसभरात ३० दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर कारवाई करुन दंडाची वसुली करण्यात आली़ फिजीकल डिस्टन्सिंग न करता फिरणाऱ्यांना कर्मचाऱ्यांनी दणका दिला़
शहरातील सिंधी कॉलनी, गिरीविहार, हाट दरवाजा, गांधी पुतळा, नेहरु चौक, बसस्थानक परिसर, अंधारे चौक, स्टेट बँक चौक, मोठा मारुती, धुळे चौैफुली, सुभाष चौक, मंगळ बाजार आदी परिसरात पूर्णपणे शुकशुकाट असल्याचे दिसून आले़ शहरातील बहुतांश नागरिक दर रविवारी सकाळी चिकन आणि मटणाच्या दुकानात हजेरी लावतात़ परंतु संचारबंदीमुळे ही दुकानेही बंद होती़ रहिवासी वसाहतींसह शहराबाहेर असलेल्या रहिवासी वसाहतीतही सकाळी ९ पूर्वी भाजीवाले दिसून आले होते़ ९ नंतर या वसाहतींमध्येही शुकशुकाट होता़ महामार्गावर वाहतूक पोलीसांकडून गस्त करुन वाहनांना शहरात प्रवेशबंदी केली़