ईको डिङोलच्या नावाने 34 लाखात फसवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2018 13:02 IST2018-10-10T13:01:53+5:302018-10-10T13:02:13+5:30

ईको डिङोलच्या नावाने 34 लाखात फसवले
नंदुरबार : बाजारभावापेक्षा 2 रूपये स्वस्त दराने तसेच पर्यावरणाला पूरक असे ईको डिङोल विक्री करण्याचा पंप देण्याच्या नावाने मलोणी ता़ शहादा येथील उद्योजकाची 34 लाख रूपयात फसवणूक करण्यात आली आह़े याप्रकरणी आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े
मुंबई येथील इंडीङोल या कंपनीने माय ईको एनर्जी नावाचे ईको डिङोल बाजारात विक्रीसाठी आणण्याची जाहिरातबाजी करत गुंतवणूकदारांना आकर्षित केले होत़े यातून मलोणी येथील उद्योजक विलास पाटील एप्रिल 2017 मध्ये संबधित कंपनीसोबत संपर्क करत डिङोल पंपाची डिलरशिपसाठी अर्ज केला होता़ या अर्जानंतर पाटील यांना डिङोल कंपनीच्या प्रतिनिधींनी भेट देत डिङोल पंप देण्याबाबत प्रतिकूलता दर्शवत कागदपत्रे आणि पैशांची मागणी केली होती़ मागणीनुसार पाटील यांनी ईंडीङोल कंपनीच्या बँक खात्यामध्ये 34 लाख 3 हजार रूपये जमा करून दिले होत़े यानंतर तिखोरा ता़ शहादा शिवारात डिङोल पंपासाठी जागा अधिग्रहीत करण्यासह बांधकाम करण्यात आले होत़े याठिकाणी डिङोल पुरवठा करण्यासाठी पाठपुरावा करूनही ते मिळाले नाही, डिङोल मिळत नसल्याने गुंतवलेली रक्कम परत मागून देण्यात आली नाही़ ऑगस्ट 2018 र्पयत हा प्रकार सुरु होता़
संबधितांकडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर विलास पाटील यांनी शहादा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन ईडीङोल कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक संतोष वर्मा अलुरी, सचिन साहेबराव लबाडे, जयंत जगन्नाथ केसकर, सारिका अनिरूद्ध शिंदे, सेल्स मॅनेजर सतीष बुरले, सेल्स मॅनेजर शहानवाज खान सर्व रा़ मुंबई, कंपनीचा नाशिक विभागाचा एरिया सेल्स मॅनेजर किशोर सिंग रा़ नाशिक व समंद करंळे रा़ लोणखेडा ता़ शहादा यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े