नाव शोधण्याची कसरत : दोन दिवसात एकही हरकत नाही, 17 र्पयत मुदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2017 14:33 IST2017-10-12T14:33:56+5:302017-10-12T14:33:56+5:30

नाव शोधण्याची कसरत : दोन दिवसात एकही हरकत नाही, 17 र्पयत मुदत
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : येथील पालिका निवडणुकीसाठी जाहीर झालेल्या प्रारूप मतदार यादीत एक लाख 261 मतदारांची नोंद करण्यात आली आहे. गेल्या पंचवार्षीकच्या तुलनेत मतदारसंख्या 15 हजार 428 ने वाढली आहे. विशेष म्हणजे पुरुषांपेक्षा महिला मतदारांची संख्या शहरात सर्वाधिक आहे. सर्वाधिक मतदार हे शेवटच्या अर्थात 19 क्रमांकाच्या प्रभागात राहणार आहेत. तर सर्वात कमी मतदार सहा क्रमांकाच्या प्रभागात राहणार आहेत.
नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात होणा:या नंदुरबार, नवापूर व तळोदा पालिका निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी जाहीर करण्यात आली आहे. 3 ऑक्टोबर रोजी अस्तित्वात असलेल्या मतदार यादीवरून ही प्रारूप यादी जाहीर करण्यात आली आहे. यादीवर 17 ऑक्टोबर्पयत हरकती व सुचना दाखल करता येणार आहेत. त्यानंतर अंतिम मतदार यादी जाहीर केली जाणार आहे.
नंदुरबार शहराची लोकसंख्या दीड लाखार्पयत गेली आहे. त्यानुसार मतदारसंख्या एक लाख 263 इतकी आहे. यात महिला मतदार 50 हजार 381 असून पुरुष मतदारांची संख्या 49 हजार 880 इतकी आहे.
प्रभाग निहाय मतदारसंख्या पुढील प्रमाणे आहे. प्रभाग एक : पुरुष-1,924, महिला- 1965, एकुण-3,889, प्रभाग दोन : पुरुष- 2,508, महिला-2,351, एकुण- 4,859, प्रभाग तीन : पुरुष-2,235, महिला-2,179, एकुण- 4, 414, प्रभाग चार : पुरुष-2,230, महिला- 2,184, एकुण-4,414, प्रभाग पाच : पुरुष- 2,303, महिला- 2,270, एकुण-4,573, प्रभाग सहा : पुरुष- 1,514, महिला- 1,480, एकुण- 2,994, प्रभाग सात : पुरुष- 2,520, महिला- 2477, एकुण- 4,997, प्रभाग आठ : पुरुष-2963, महिला- 2,891, एकुण- 5,854, प्रभाग नऊ : पुरुष- 2,680, महिला- 2,674, एकुण-5,354, प्रभाग दहा : पुरुष- 3,254, महिला-3,443, एकुण- 6,697, प्रभाग 11 : पुरुष- 3,174, महिला-3270, एकुण-6,444, प्रभाग 12 : पुरुष-2,397, महिला-2,581, एकुण-4,978, प्रभाग 13 : पुरुष-2,197, महिला-2,386, एकुण-4,583, प्रभाग 14 : पुरुष- 2,575, महिला-2, 684, एकुण-5,361.
प्रभाग 15 : पुरुष-3192, महिला-3,233, एकुण- 6,425, प्रभाग 16 : पुरुष-2529, महिला-2616, एकुण- 5,145, प्रभाग 17 : पुरुष-2664, महिला-2645, एकुण-6,630, प्रभाग 18 : पुरुष-3,216, महिला-3,414, एकुण- 6,630 प्रभाग 19 : पुरुष- 3805, महिला-3,638, एकुण- 7,443 इतकी मतदारसंख्या आहे.
नवापूरात चार हजारांनी मतदार वाढले
4नवापूर पालिका निवडणुकीसाठी 28 हजार 791 मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. प्रारुप मतदार यादीत दहा प्रभागांची मतदार यादी जाहीर करण्यात आली आहे. एकुण मतदारांमध्ये 14 हजार 541 पुरुष तर 14 हजार 250 महिला मतदार आहेत. सर्वाधिक मतदार प्रभाग क्रमांक तीन मध्ये 4,111 तर सर्वात कमी सर्वात कमी प्रभाग क्रमांक दहा मध्ये दोन हजार 299 मतदार आहेत.
4प्रभाग निहाय मतदारांमध्ये प्रभाग एक : पुरुष-1,228, महिला- 1,288 एकुण- 2,516, प्रभाग दोन : पुरुष- 1,439, पुरुष-1,269, एकुण-2,708, प्रभाग तीन : पुरुष 2,102, महिला-2009, एकुण- 4,111, प्रभाग चार : पुरुष- 1,248, महिला-1,187, एकुण-2,435, प्रभाग पाच : पुरुष 1,304, महिला- 1,325, एकुण- 2,629, प्रभाग सहा : पुरुष-1,425, महिला- 1,453, एकुण-2,868, प्रभाग सात : पुरुष-1,643, महिला-1,564, एकुण-3,207, प्रभाग आठ : पुरुष-1,756, महिला-1,770, एकुण- 3,526, प्रभाग नऊ : पुरुष-1,280, महिला-1,212, एकुण- 2,492 तर प्रभाग दहा : पुरुष- 1,126, महिला- 1,173, एकुण-2,299.