चिनोदा चौफुलीला क्रांतिवीर तंट्या मामा भिल नाव द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:27 IST2021-04-03T04:27:00+5:302021-04-03T04:27:00+5:30

याबाबत तळोदा पालिका मुख्याधिकारी, नगराध्यक्ष व तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, देशाला इंग्रजांच्या तावडीतून मुक्त करण्यासाठी आदिवासी ...

Name Chinoda Chaufuli as Krantiveer Tantya Mama Bhil | चिनोदा चौफुलीला क्रांतिवीर तंट्या मामा भिल नाव द्या

चिनोदा चौफुलीला क्रांतिवीर तंट्या मामा भिल नाव द्या

याबाबत तळोदा पालिका मुख्याधिकारी, नगराध्यक्ष व तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, देशाला इंग्रजांच्या तावडीतून मुक्त करण्यासाठी आदिवासी क्रांतिकारकांचा इतिहास महत्त्वाचा आहे. सातपुडा डोंगरातील अनेक भिल्ल नायकांनी इंग्रजाविरुद्ध प्रखर लढा दिला. त्यात तंट्या मामा भिल यांनी अन्याय करणारे इंग्रज, जमीनदार, सावकार यांच्याविरुद्ध प्रखर लढा देऊन सातपुडा पट्ट्यात गरीब लोकांचे व आदिवासींचे संरक्षण केले. सातपुडा पट्ट्यात त्यांना प्रेमाने ‘मामा’ म्हणत. त्यांच्या वागण्यातून सत्य, न्याय, दया आणि प्रेम ही तत्त्वे प्रकट होत होती. म्हणून तमाम आदिवासींसकट सर्व जनतेच्या भावनांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून शहरातील चिनोदा चौफुलीला क्रांतिवीर तंट्या मामा भिल यांचे नाव देण्याची मागणी निवेदनात केली आहे. निवेदनावर बिरसा क्रांती दलाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र पाडवी व भिलीस्थान टायगर सेनेचे तालुकाध्यक्ष राजू प्रधान यांच्या सह्या आहेत.

Web Title: Name Chinoda Chaufuli as Krantiveer Tantya Mama Bhil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.