यशस्वी शस्त्रक्रियेनंतर 20 तासांनी निघाले नाकातील लाकूड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2018 13:20 IST2018-11-04T13:20:05+5:302018-11-04T13:20:15+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : गालातून नाकात घुसलेली झाडाच्या फांदींचे लाकूड चार      तासांच्या सलग शस्त्रक्रियेनंतर काढण्यात येथील ...

Naka wood after 20 hours of successful operation | यशस्वी शस्त्रक्रियेनंतर 20 तासांनी निघाले नाकातील लाकूड

यशस्वी शस्त्रक्रियेनंतर 20 तासांनी निघाले नाकातील लाकूड

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : गालातून नाकात घुसलेली झाडाच्या फांदींचे लाकूड चार      तासांच्या सलग शस्त्रक्रियेनंतर काढण्यात येथील डॉ.राजेश कोळी यांना यश मिळाले. 20 तासांपासून मृत्यूशी झुंज देणा:या युवकाला जीवदान मिळाल्याने त्याच्या कुटूंबियांनी समाधान व्यक्त केले. 
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, लालपूर, ता.अक्कलकुवा येथील तुलसीदास बहादुरसिंग पाडवी (26) याचा सातपुडय़ातील दुर्गम भागातील भराडीपादर ते कुवा दरम्यानच्या रस्त्यावर शुक्रवारी दुपारी दोन वाजता अपघात झाला. दुचाकी झाडाला ठोकली गेल्याने सागाच्या झाडाची फांदी त्याच्या गालातून अर्थात डोळ्याच्या खालच्या भागातून थेट नाकात घुसली. तशा अवस्थेत तो पडून होता. परंतु कुणीही त्याला मदत करीत नव्हते. त्या भागातून जाणा:या एका शिक्षकाने त्याला खापर आरोग्य केंद्रात दाखल केले. तेथून त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्याला नंदुरबारातील भगवती हॉस्पीटलमध्ये शुक्रवारी रात्री दहा वाजता दाखल केले गेले. डॉ.राजेश कोळी यांनी त्याला तपासून शनिवारी सकाळी शस्त्रक्रिया करण्याचे निश्चित केले. शनिवारी सकाळी सहा वाजता शस्त्रक्रिया सुरू करण्यात आली. सलग चार तासानंतर  पाच इंच लांब आणि 10 ते 15 मि.मी.जाड असलेली फांदीचे लाकूड काढण्यात यश आले. रुग्णाच्या तोंडाला दहा ठिकाणी फॅर झाले होते. डॉ.राजेश कोळी यांना डॉ.जगदेव, डॉ.राहुल वसावे यांनी सहकार्य केले.

Web Title: Naka wood after 20 hours of successful operation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.