नागराजाचा मोटरसायकलवर तब्बल ३० किलोमीटर प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:34 IST2021-03-09T04:34:29+5:302021-03-09T04:34:29+5:30
याबाबत वृत्त असे की, चिखली कानडीहून गणोरला मोटरसायकलीने तीन जण निघाले. म्हसावद, टवळाई, गणोर, अंबापूरहून लक्कडकोटला आल्यावर थांबले असता ...

नागराजाचा मोटरसायकलवर तब्बल ३० किलोमीटर प्रवास
याबाबत वृत्त असे की, चिखली कानडीहून गणोरला मोटरसायकलीने तीन जण निघाले. म्हसावद, टवळाई, गणोर, अंबापूरहून लक्कडकोटला आल्यावर थांबले असता गावातील एकाला नागाची शेपूट दिसली व गाडीजवळ गर्दी जमा झाली. योगायोगाने म्हसावद येथील सर्पमित्र समाधान लांडगे शेतीच्या कामानिमित्त लक्कडकोटला गेलेले होते. गर्दी पाहून ते तेथे गेले असता मोटरसायकलीच्या (क्रमांक एम.एच.३९ -३०२८) पेट्रोलच्या टाकीखालून बाहेर निघालेला नाग दिसला. गर्दी व हालचाल पाहून नाग पुन्हा मध्ये घुसला. दोन्ही बाजूचे झाकण फोडून गाडीचे अनेक भाग उघडावे लागले. मोठ्या परिश्रमानंतर नागराजाला सर्पमित्र लांडगे यांनी बाहेर काढले. उष्णता व घर्षण यामुळे हा नाग थकलेला दिसत असल्याचे लांडगे यांनी सांगितले. नाग बाहेर काढल्यावर मोटरसायकलस्वारांनी सुटकेचा श्वास सोडला. रात्री वाहन उभे करताना अडगळीत, कचरा असल्याच्या ठिकाणी उभे करू नये. अशा ठिकाणी सापाचा वावर असल्याने वाहनात घुसत असतात, असे लांडगे यांनी सांगितले.