माझे कुटूंब माझी जबाबदारी मोहिम सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2020 12:24 IST2020-09-21T12:24:39+5:302020-09-21T12:24:47+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोना जनजागृती आणि आरोग्य सर्वेक्षणासाठी शासनाने माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिम हाती घेतली आहे़ ...

माझे कुटूंब माझी जबाबदारी मोहिम सुरू
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : कोरोना जनजागृती आणि आरोग्य सर्वेक्षणासाठी शासनाने माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिम हाती घेतली आहे़ यांतर्गत रविवारी आरोग्य सर्वेक्षण सुरू करण्यात आले़ जिल्ह्यात ठिकठिकाणी आरोग्य कर्मचाऱ्यांनी घरोघरी जात नागरिकांच्या आरोग्याची माहिती घेण्यास सुरूवात केली़
शहादा येथे आमदार राजेश पाडवी यांच्या उपस्थितीत सर्वेक्षण साहित्य वाटप करून शुभारंभ करण्यात आला. यावेळी नगराध्यक्ष मोतीलाल पाटील, पंचायत समिती सभापती बायजाबाई भिल, सातपुडा कारखान्याचे चेअरमन दिपकभाई पाटील, उपविभागीय अधिकारी चेतन गिरासे, तहसीलदार मिलिंद कुलकर्णी, नगरपालिकेचे मुख्याधिकारी राहुल वाघ, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ़ राजेंद्र वळवी आदी उपस्थित होते.
नवापूर येथे आमदार शिरीषकुमार नाईक यांच्या घरापासून सर्वेक्षणास प्रारंभ करण्यात आला. सर्व नागरिकांनी आरोग्य पथकाला सहकार्य करावे व मोहिमेत सहभाग घ्यावा, असे आवाहन आमदार शिरीषकुमार नाईक यांनी यावेळी केले. प्रसंगी नगराध्यक्षा हेमलता पाटील, सहायक जिल्हाधिकारी तथा पालिका मुख्याधिकारी तृप्ती धोडमिसे, तालुका वैद्यकीय अधिकारी शशिकांत वसावे आदी उपस्थित होते. आमदार नाईक यांनी आदिवासी भाषेतून नागरिकांना मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले.
धडगाव येथे तहसीलदार ज्ञानेश्वर सपकाळे आणि तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.दिनेश वळवी यांच्या उपस्थितीत नगरसेवक फकीरा परमार यांच्या हस्ते मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी वैद्यकीय अधीक्षक संतोष परमार, डॉ.विष्णु हांगे, डॉ.मोहनकुमार मुलगीर आदी उपस्थित होते. मोहिमेच्या प्रतिज्ञेचे वाचन करून नागरिकांना कोरोनाबाबत घ्यावयाच्या दक्षतेविषयी माहिती देण्यात आली.
दिवसभरात शहादा तालुक्यात तºहाडी, कलसाडी, सुलवाडा, नंदुरबार तालुक्यात ढेकवद तर धडगाव तालुक्यात सोन बुद्रुक, आणि राजबर्डी या गावातही सर्वेक्षण करण्यात आले. आरोग्य कर्मचारी घरोघरी जाऊन तापमान, आॅक्सिजन पातळीची नोंद घेत आहेत़ तसेच घरात इतर आजार असणाºया व्यक्तिंविषयी माहिती घेत त्याच्या नोंदी ठेवत असल्याचे कळवण्यात आले आहे़