कौटूंबिक वादातून लहान शहादे येथे महिलेचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2019 12:06 IST2019-07-13T12:06:14+5:302019-07-13T12:06:19+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क लहान शहादे : तालुक्यातील लहान शहादे येथे कौटूंबिक वादातून पतीने पत्नीवर कोयत्याने वार करुन गंभीर जखमी ...

The murder of the woman at the small Shahada family dispute | कौटूंबिक वादातून लहान शहादे येथे महिलेचा खून

कौटूंबिक वादातून लहान शहादे येथे महिलेचा खून

लोकमत न्यूज नेटवर्क
लहान शहादे : तालुक्यातील लहान शहादे येथे कौटूंबिक वादातून पतीने पत्नीवर कोयत्याने वार करुन गंभीर जखमी केल़े गुरुवारी रात्री 11़30 वाजता ही घटना घडली़ महिलेवर उपचार सुरु असताना धुळे येथे मृत्यू झाल्याची माहिती आह़े   
लहान शहादे येथील वन्या जामसिंग भिल याचा पत्नी सेवाबाई यांच्यासोबत गुरुवारी रात्री वाद झाला होता़ यातून रात्री साडेअकरा वाजता वन्या भिल याने घरातील कोयता थेट महिलेच्या डोक्यात घालून जखमी केले होत़े ग्रामस्थांनी गंभीर जखमी सेवाबाई यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले होत़े परंतू रक्तस्त्राव अधिक झाल्याने त्यांना धुळे जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले होत़े याठिकाणी उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आह़े 
दरम्यान पोलीस निरीक्षक बाळासाहेब भापकर यांनी घटनास्थळी भेट देत संशयित पती वन्या भिल यास ताब्यात घेतल़े याबाबत मनू जयसिंग भिल यांनी उपनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन संशयित वन्या भिल याच्याविरोधात गुन्हा दाखल आह़े तपास पोलीस उपनिरीक्षक रुपाली महाजन करत आहेत़ 
 

Web Title: The murder of the woman at the small Shahada family dispute