चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा गळा दाबून खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2017 13:06 IST2017-08-16T13:06:24+5:302017-08-16T13:06:24+5:30

The murder of the wife by the stranglehold of character | चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा गळा दाबून खून

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा गळा दाबून खून

लोकमत ऑनलाईन न्यूज
नंदुरबार : चारित्र्याच्या संशयावरून प}ीचा गळा दाबून खून केल्याची घटना सारंगखेडा येथे. 14 रोजी मध्यरात्री घडली. सारंगखेडा पोलीस ठाण्यात पती क्रिष्णा चंदर ठाकरे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सरीता क्रिष्णा ठाकरे (24) असे मयत महिलेचे नाव आहे. सारंगखेडा येथील जुनी भिलाटी भागात राहणारा क्रिष्णा चंदर ठाकरे हा आपली प}ी सरीता हिच्यावर चारित्र्याचा संशय घेत होता. त्या संशयातूनच त्याने 14 ऑगस्ट रोजी मध्यरात्री झोपेतच सरीता हिचा गळा दाबून तिचा खून केला. सकाळी ही बाब लक्षात आल्यावर खळबळ उडाली. याबाबत अशोक विश्राम भिल यांनी फिर्याद दिल्याने क्रिष्णा चंदर ठाकरे याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 

Web Title: The murder of the wife by the stranglehold of character