जलतरण तलाव लोकार्पणासाठी सेनाप्रमुखांना पालिकेचे आमंत्रण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2019 13:07 IST2019-07-27T13:07:02+5:302019-07-27T13:07:09+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : पावणेतीन कोटी रुपये खर्च करून बनविण्यात आलेल्या जलतरण तलावाचे उद्घाटन शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे किंवा ...

Municipality invites army chiefs to launch swimming pools | जलतरण तलाव लोकार्पणासाठी सेनाप्रमुखांना पालिकेचे आमंत्रण

जलतरण तलाव लोकार्पणासाठी सेनाप्रमुखांना पालिकेचे आमंत्रण

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : पावणेतीन कोटी रुपये खर्च करून बनविण्यात आलेल्या जलतरण तलावाचे उद्घाटन शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे किंवा युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. त्याबाबतचे निमंत्रण देखील पालिकेकडून पाठविण्यात आले असल्याची माहिती आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी  दिली.
याबाबत माहिती देतांना आमदार रघुवंशी यांनी सांगितले, पालिकेने ऑलिम्पिीक खेळाच्या धर्तीवर जलतरण तलाव बांधला आहे. त्याचे काम पुर्णत्वास आले आहे. 15 ऑगस्टर्पयत काम पुर्ण करून त्याचे लोकार्पण करण्यात येणार आहे. साधारणत: 15 ते 30 ऑगस्टच्या दरम्यान लोकार्पण कार्यक्रम होणार आहे. जलतरण तलावाला सेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात आले आहे. त्यामुळे त्यांच्याच परिवाराच्या हस्ते त्याचे उद्घाटन व्हावे अशी अपेक्षा शहरवासीयांची व नगरपालिकेची आहे. त्यामुळे शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे किंवा युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना आमंत्रीत करण्यात येणार आहे. दोघांनाही अधिकृत आमंत्रण देण्यात आले असल्याची माहिती आमदार रघुवंशी यांनी दिली. 
ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ात या जलतरण तलावाचे लोकार्पण करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, जलतरण तलावाच्या दोन्ही बाजुला व प्रवेशाच्या ठिकाणी परिसरातील नागरिकांनी गोठे तयार केले आहे. गोठय़ातील शेण व इतर घाण रस्त्यावरच टाकली जात आहे. त्यामुळे या चांगल्या वास्तूच्या सौंदर्याला डाग लागत आहे. शिवाय या रस्त्याने वापरणा:या नागरिकांना देखील मोठय़ा गैरसोयीला सामोरे  जावे लागत आहे. ही बाब लक्षात  घेता येथील गोठे हटविण्यासाठी प्रसंगी कठोर पाऊल उचलावे लागेल असेही आमदार रघुवंशी यांनी स्पष्ट केले.

Web Title: Municipality invites army chiefs to launch swimming pools

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.