पालिका कर्मचा:यास दोघांची मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2019 12:25 IST2019-11-11T12:25:53+5:302019-11-11T12:25:59+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : पालिकेच्या पाण्याची पाईपलाईन खोदकाम करत असतांना खाजगी पाईपलाईन तुटल्याच्या वादातून दोघांनी पालिका कर्मचा:यास बेदम ...

पालिका कर्मचा:यास दोघांची मारहाण
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : पालिकेच्या पाण्याची पाईपलाईन खोदकाम करत असतांना खाजगी पाईपलाईन तुटल्याच्या वादातून दोघांनी पालिका कर्मचा:यास बेदम मारहाण केल्याची घटना नवापूर येथे 9 रोजी घडली. याप्रकरणी दोघांविरुद्ध मारहाण व शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नवापूर येथे गढीपरिसरात पािलकेतर्फे पाईपलाईनचे काम सुरू आहे. त्यावेळी त्या भागातील अंबादास आतारकर यांची खाजगी पाईपलाईन तुटली. आतारकर यांनी तेथे असलेले पालिकेचे फिटर राकेश गावीत यांना ती नवीन करून देण्याचे सांगितले.
गावीत यांनी नवीन पाईप आणून खाजगी पाईलन दुरूस्ती करत असतांना हलक्या दर्जाचा पाईप आणला म्हणून आतारकर यांनी त्यांच्याशी वाद घातला. वादाचे पर्यावसान मारहाणीत झाले. अंबादास व बबल्या आतारकर यांनी राकेश गावीत यांना बेदम मारहाण केली.
याबाबत दोघांविरुद्ध नवापूर पोलिसात मारहाण व सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास फौजदार पठाण करीत आहे.