दिव्यांगांना पालिकेचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2019 12:18 IST2019-11-29T12:18:01+5:302019-11-29T12:18:09+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : शहरी भागातील दिव्यांग बांधवांना पालिकेमार्फत त्यांच्या स्वत:च्या उत्पन्नातून पाच टक्के निधी वाटप करण्यात यावा, ...

Municipal support for the disabled | दिव्यांगांना पालिकेचा आधार

दिव्यांगांना पालिकेचा आधार

लोकमत न्यूज नेटवर्क
तळोदा : शहरी भागातील दिव्यांग बांधवांना पालिकेमार्फत त्यांच्या स्वत:च्या उत्पन्नातून पाच टक्के निधी वाटप करण्यात यावा, असा शासन निर्णय जाहिर करण्यात आला आहे. त्यानुसार तळोदा पालिकेने शहरातील 148 नोंदणीकृत दिव्यांग बांधवांना एम हजार 218 प्रमाणे एक लाख 80 हजाराचा निधी वाटप करण्यात आला आहेत. 
तळोदा शहरातील दिव्यांग बांधवांना पालिकेमार्फत पाच टक्के निधी वाटप करीत त्यांना आधार द्यावा, अशी मागणी प्रहार अपंग क्रांती संघटनेतर्फे करण्यात येत होती. या मागणीसाठी संघटनेचे तळोदा तालुकाध्यक्ष मंगलचंद जैन, जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र कलाल, दिलीप जोहरी, रसिलाबाई देसाई यांनी सातत्याने नगराध्यक्ष अजय परदेशी, मुख्याधिकारी सपना वसावा, उपनगराध्यक्षा भाग्यश्री चौधरी यांच्याकडे पाठपुरावा सुरू ठेवला. या पाठपुराव्याची दखल घेत शिवाय दिव्यांग बांधवांची दयनिय अवस्था लक्षात घेत तळोदा पालिका प्रशासनामार्फत मागणी मंजूर करण्यात आली आहेत. 
या मागणीसाठी संघटनेने शासन निर्णयाचा आधार घेत विधायक मार्गाने मागणी केली असून यश देखील पदरी पाडून घेतले आहे. मागणी मंजूर करीत शहरातील 148 दिव्यांग बांधवांना प्रत्येकी एक हजार 218 असा एकुण एक लाख 80 हजाराचा निधी वाटप केला आहे. ही रक्कम दिव्यांग बांधवांच्या खात्यावर थेट जमा करण्यात आल्याचे पालिका प्रशासनामार्फत सांगण्यात आले. पालिकेच्या या भूमिकेमुळे दिव्यांग बांधवांच्या नोंदणीत मोठी भर पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दिव्यांगांसाठी जारी करण्यात आलेल्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करणा:या पालिकांपैकी तळोदा पालिका ही एक स्थानिक स्वराज्य संस्था असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे अन्य पालिकांमार्फत देखील त्या-त्या शहरातील दिव्यांग बांधवांसाठी अशी योजना राबवावी अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.


दिव्यांग बांधवांच्या समस्या सामान्यांपेक्षा वेगळ्या व अधिक असतात. त्यामुळे शहरी भागातील दिव्यांगाना पालिकेने स्वउत्पन्नातून आर्थिक हातभार लावावा, असा आदेश शासनामार्फत देण्यात आला आहे. त्यानुसार शासनाच्या आदेशाचे पालन करीत तळोदा पालिकेमार्फत योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. वार्षीक निधी वाटप केल्यानंतर त्यांना निवा:याचाही आधार मिळावा, म्हणून त्यांना पालिकेमार्फत आकारण्यात येणारी घरपट्टी 50 टक्के माफ करण्याचा ठराव देखील तळोदा पालिकामार्फत मंजूर करण्यात आला आहे. त्यानुसार पुढील वर्षापासून या ठरावानुसार 50 टक्के घरपट्टी माफ करण्यात येणार असल्याचे पालिका प्रशासनामार्फत सांगण्यात आले.
 

Web Title: Municipal support for the disabled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.