अवैध वृक्षतोड करणाऱ्यांवर पालिका कारवाई करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2020 12:08 IST2020-09-15T11:45:27+5:302020-09-15T12:08:54+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिर्ण व पडक्या वृक्षांच्या नावाखाली शहरात अनेकजण चांगल्या वृक्षांवर कुºहाड चालवित असल्याचा प्रकार समोर ...

Municipal Corporation will take action against illegal loggers | अवैध वृक्षतोड करणाऱ्यांवर पालिका कारवाई करणार

अवैध वृक्षतोड करणाऱ्यांवर पालिका कारवाई करणार


लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिर्ण व पडक्या वृक्षांच्या नावाखाली शहरात अनेकजण चांगल्या वृक्षांवर कुºहाड चालवित असल्याचा प्रकार समोर येत आहे. दोन दिवसांपूर्वी नंदुरबारात एक पडणारे झाड तोडण्यासह दुसरेही चांगले झाड तोडले गेले. दरम्यान, विना परवाणगी चांगले झाडे तोडणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा पालिकेने दिला आहे.
नंदुरबार शहरात अनेक मोठे वृक्ष तोडले जात आहेत. घर, इमारती यांना धोका निर्माण होईल अशी कारणे सांगून ही वृक्षतोड होत आहे. पर्यावरण प्रेमी नागरिकांमध्ये यामुळे अस्वस्थता आणि नाराजी देखील आहे. ‘लोकमत’ने हा प्रश्न लावून धरल्यानंतर अनेकांनी समाधान व्यक्त केले. पालिकेनेही आता ठोस भुमिका घेण्याचे ठरविल्याने समाधान व्यक्त होत आहे. ज्यांनी मोठी व जुनी झाडे तोडली आहेत त्यांच्यावर काय कारवाई करणार याकडे आता लक्ष लागून आहे.
गेल्या आठवड्यात अहिल्यादेवी विहिर समोरील कुंभारवाडा परिसरात एक झाड उन्मळून पडले होते. ते तोडण्यात आले. त्यानंतर त्याच ठिकाणी दुसरे झाडही उन्मळून पडेल अशी भिती या परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली. त्यामुळे दुसरे मोठे झाडही तोडण्यात आले. असेच प्रकार शहरातील अनेक भागात झाले आहेत. घराला, इमारतीला धोका असल्याचे भासवून मोठी झाडे तोडली जात आहेत. काहीजण आपले प्लॉट, घर विक्रीला अडचणीचे ठरणाºया चांगल्या झाडांवरही कुºहाड चालवित आहेत.
याबाबत पालिकेकडे अनेक पर्यावरण प्रेमी नागरिकांनी तक्रारी केल्या, परंतु उपयोग झाला नाही. पालिकेने याबाबत आता कठोर भुमिका घेण्याचे ठरविले आहे. जे नागरिक चांगल्या झाडांवर कुºहाड चालवतील त्यांच्यावर पर्यावरण अधिनियमाद्वारे कारवाई करण्यात येणार आहे.
जे कुणी नियमबाह्य झाडे तोडत असतील तर त्यांच्या तक्रारी पालिकेकडे कराव्या असे आवाहन देखील करण्यात आले आहे.
जिर्ण व धोकेदायक झाडे तोडण्यास परवाणगी देण्यात आली आहे. परंतु त्याआड जर कुणी चांगली झाडे तोडत असतील तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. पालिकेने घर बांधकाम परवाणगी घेतांनाच वृक्ष लागवडीचीही अट टाकलेले असते. पर्यावरण संवर्धसाठी पालिका कटीबद्ध आहे.
-रत्ना चंद्रकांत रघुवंशी, नगराध्यक्षा.
 

Web Title: Municipal Corporation will take action against illegal loggers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.