संचारबंदीत अडकला पाडव्याचा मुहूर्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2020 14:24 IST2020-03-25T14:23:55+5:302020-03-25T14:24:05+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोना प्रामुख्याने मानवी आरोग्यावर परिणाम करीत असल्याने आरोग्याचीच काळजी घेतली जात असली तरी या ...

संचारबंदीत अडकला पाडव्याचा मुहूर्त
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : कोरोना प्रामुख्याने मानवी आरोग्यावर परिणाम करीत असल्याने आरोग्याचीच काळजी घेतली जात असली तरी या नव्या संकटाने अवघे मानवी जीवनच व्यापले आहे. परिणामी बाजारपेठा बंद पडल्या, आर्थिक समस्या निर्माण झाल्या व जनजीवन विस्कळीत झाले. त्यातच सर्वच प्रकारचे मुहूर्त देखील प्रभावित झाले. अनेक लग्नाचे मुहूर्त मोडत लग्नसोहळेच पुढे ढकलले, अशा काही कामांसाठी पुन्हा मुहूर्त बघता येईल. मात्र पाडव्याच्या मुहूतार्साठी वर्षभर प्रतिक्षा करावी लागणार आहे.
साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडवा सणानिमित्त वाहन बाजारपेठा सज्ज होतात. मराठी नववर्ष असल्याने याचा मुहूर्त साधत ग्राहक देखील वस्तु व साधनांची खरेदी तथा बुकिंग करण्यासाठी गर्दी करतात. ग्राहकांचा कौल लक्षात घेत विविध कंपन्या देखील अनेक आफर्स जाहिर करतात, परंतु यंदाच्या पाडव्याच्या आधिच कोरोनाचे संकट निर्माण झाले, त्यामुळे कंपन्यांकडून फारशा आफर्स जाहिर करण्यात आला नाही. असे असतांनाच गुढी पाडव्याच्या दोन दिवस आधी कोरोनाच्या पाश्वूर्मीवरच जनता कर्फ्यू, हा कर्फ्यू संपताच महाराष्टÑ लॉकडाऊन केले. परंतु या बंदीबाबत जतना फारशी मनावर घेत नसल्याचे दिसून येताच पुन्हा संचारबंदी लागू करण्यात आली. अशा सातत्याने सुरू असलेल्या बंदीच्या घडामोडींमुळे संपूर्ण बाजारच बंद पडला.
बुधवारी गुढीपाडवा असून याच्या मुहूर्तावर नवीन वाहने घरी नेण्यासाठी ग्राहकांनी तयारी सुरू केली होती. बहुतांश ग्राहकांनी दुचाकीसह चारचाकीचीही बुकिंगची तयारी केली होती, परंतु कोरोना व्हायरसमुळे ही सर्वच कामे अडचणीत सापडली आहे. त्यामुळे यंदाच्या पाडव्यावर होणारी कोवट्यवधींची आर्थिक उलाढाल नाममात्र राहणार असल्याचे म्हटले जात आहे.