ब्रिटीशकालीन तलावातून निघणार गाळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2019 12:10 IST2019-02-22T12:10:16+5:302019-02-22T12:10:23+5:30
शनिमांडळ : ग्रामस्थांच्या पाठपुराव्याला आले यश, सिंचन क्षमता वाढणार

ब्रिटीशकालीन तलावातून निघणार गाळ
नंदुरबार : नंदुरबार तालुक्यातील शनिमांडळ येथील ब्रिटीशकालीन तलावाचा गाळ काढण्याच्या कामाला प्रशासनाकडून तांत्रिक मान्यता देण्यात आली आह़े स्थानिक ग्रामस्थांच्या पाठपुराव्याला यानिमित्त मोठे यश आले, असे म्हणता येईल़
शासकीय खर्चातून हा गाळ काढण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आह़े दरम्यान, यासाठी आवश्यक ती मदत स्वयंसेवी संस्थांकडून देण्यात येणार आह़े शनिमांडळ येथे ब्रिटीश कालीन गाव तलाव आह़े या तलावात सुमारे 15 ते 20 फूट जाडी असलेला गाळाचे संचयन झाले आह़े त्यामुळे पावसाळ्यात हा तलाव पूर्ण क्षमतेने भरत नसून पावसाचे पाणी वाहून जात आह़े
साधारणत: 1937 साली हा तलाव ब्रिटीश शासनाकडून बांधण्यात आला होता़ पहिल्यापासून नंदुरबार तालुक्यातील पुव्रेकडील भागात पाण्याची वानवा आह़े भौगोलिक कारणांमुळे या ठिकाणी सरासरीच्या तुलनेत निम्यापेक्षाही कमी पाऊस पडत असल्याने या ठिकाणी पाण्याचे नेहमीच दुर्भिष्य जाणवत असत़े त्यामुळे ब्रिटीश सरकारणे या ठिकाणी तलाव बांधून त्यावेळी पाण्याचे नियोजन केले होत़े परंतु बरीच वर्षे होऊनदेखील अद्यार्पयत या तलावातून गाळ काढण्यात आलेला नव्हता़ शनिमांडळ येथील तलाव तसेच आंबेबारा येथील तलावाच्या माध्यमातून शनिमांडळसह, तिलाली, तलवाडे, रजाळे, बलवंड या गावांची तहान भागवली जात असत़े आता सध्या हा गावतलाव पूर्णपणे कोरडा झाला असून या तलावाचा गाळ काढणेही प्रशासनाला सोयीस्कर ठरणार आह़े गावात दरवेळी कमी अधिक प्रमाणात पाणी राहत असल्याने गाळ काढण्यासाठी व्यत्यय येत होता़
परंतु यंदा जिल्ह्यात केवळ 67 टक्के इतक्या पावसाची नोंद करण्यात आली असल्याने साहजिकच तलावदेखील कोरडा पडलेला आह़े त्यामुळे तलावाचा गाळ काढण्यात यावा यासाठी गावातील ग्रामस्थांकडून मोठय़ा प्रमाणात पाठपुरावा करण्यात आला होता़ याची दखल घेत प्रशासनाने काळ काढण्याच्या कामाला तांत्रिक मंजूरी दिली होती़ दरम्यान, लवकरात लवकर हे काम पूर्ण करण्यात यावे अशी मागणी आता ग्रामस्थांकडून करण्यात येत आह़े विशेष म्हणजे गाळ काढण्याच्या कामांसाठी जैन संघटनांकडून मदत करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आह़े गाळ काढण्यासाठी पोकलॅण्ड उपलब्ध झाल्यास त्वरीत गाळ काढणीच्या कामाला सुरुवात करण्यात येणार आह़े या कामासाठी स्थानिक ग्रामस्थांनीही पुढाकार घेऊन लोकसहभाग वाढविण्याची अपेक्षा प्रशासनाकडून व्यक्त करण्यात येत आह़े