जुनी पेन्शन योजनेसह विविध मागण्यांसाठी शिक्षकांचे धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2019 12:25 IST2019-12-23T12:25:46+5:302019-12-23T12:25:52+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसह शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्याच्या मागणीसाठी जिल्ह्यातील विविध शिक्षक ...

Movement of teachers for various demands including old pension scheme | जुनी पेन्शन योजनेसह विविध मागण्यांसाठी शिक्षकांचे धरणे आंदोलन

जुनी पेन्शन योजनेसह विविध मागण्यांसाठी शिक्षकांचे धरणे आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसह शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्याच्या मागणीसाठी जिल्ह्यातील विविध शिक्षक संघटनांतर्फे येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
अखिल महाराष्टÑ प्राथमिक शिक्षक संघ ही अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाशी संलग्न महाराष्टÑातील एकमेव संघटना आहे. या संघटनेच्या नेतृत्वाखाली झालेल्या धरणे आंदोलनात इप्टा संघटना, जुनी पेन्शन हक्क संघटना, पुरोगामी शिक्षक संघटना, महाराष्टÑ राज्य प्राथमिक शिक्षक संघ, महाराष्टÑ प्राथमिक शिक्षक संघ, तलाठी संघटना, मागासवर्गीय प्राथमिक शिक्षक संघ आदी संघटनांनी पाठींबा दिला होता.
आंदोलनातील प्रमुख मागण्या
जीवन वेतन १ तारखेला होण्याबाबत व वेतनास दिरंगाई करणाऱ्या आहरण व संवितरण अधिकाऱ्यांवर कार्यवाही प्रस्तावित व्हावी, डीसीपीएसधारकांच्या कपातीचे पूर्ण व अचूक अद्ययावत हिशेब व सातव्या वेतन आयोगाची डीसीपीएसधारकांचा थकबाकीचा पहिला हप्ता रोखीने अदा करण्यात यावा, १ नोव्हेबर २००५ नंतरच्या सेवेत लागलेल्या शिक्षक व कर्मचाºयांचा मृत्यू झालेल्या कुटुंबीयांना फॅमिली पेन्शन लागू करावी, प्रलंबीत निवड श्रेणीचे व वरिष्ठश्रेणीचे सर्व प्रस्ताव सर्व जिल्हा परिषदांनी विनाविलंब निकाली काढून व यासंबधी तालुकास्तरावर अधिकारांचे विकेंद्रकरण व्हावे, शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, विषय शिक्षक यांची रिक्त पदे शिक्षकांच्या सेवा ज्येष्ठतेमधून तातडीने १०० टक्के भरण्याबाबत सर्व जिल्हा परिषदांना शासनाने आदेशीत करावे आदी मागण्यांचा समावेश आहे.
१ नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत रुजू झालेल्या प्राथमिक शिक्षकांसह सर्व संवर्गातील कर्मचारी यांना जुनी पेन्शन योजना लागू व्हावी या प्रमुख मागणीकरीता आंदोलन छेडण्यात आले असून या प्रमुख मागणीसह शासनाने प्रलंबित प्रश्नांबाबत सकारात्मकपणे निर्णय घेऊन प्रश्न सोडवावेत. तसे न झाल्यास आंदोलन तीव्र करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला. आंदोलनात विविध शिक्षक व कर्मचारी संघटनांच्या पदाधिकाºयांनी सहभाग घेतला.

Web Title: Movement of teachers for various demands including old pension scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.