शहरं
Join us  
Trending Stories
1
बलात्काराचा आरोपी, आप आमदार हरमीत सिंग पठानमाजरा ऑस्ट्रेलियाला पळाला! आप सरकारवर टीका...
2
"राष्ट्रवादीची औलाद सत्तेशिवाय राहू शकत नाही"; तानाजी सावंतांच्या वादग्रस्त विधानामुळे महायुतीत मोठा भूकंप
3
इराणमध्ये खळबळ! राजधानी तेहरानचे पाणी संपले; अवघ्या दोन आठवड्यांत शहरे रिकामी करावी लागणार...
4
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! आठवडाभरात सोन-चांदीत मोठी घसरण! काय आहेत आजचे दर?
5
'मातोश्री'वर ड्रोनची नजर? टेहळणी होत असल्याचा ठाकरे गटाचा आरोप, मुंबई पोलीस म्हणाले, "परवानगी होती..."
6
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक
7
आईचे दुसऱ्या महिलेशी समलैंगिक संबंध, प्रेमासाठी चिमुकल्याची हत्या; पतीच्या हाती लागला व्हिडिओ अन् मग...
8
कधीकाळी चालवायचे रिक्षा, आता मुलाच्या वाढदिवशी लग्झरी कार दिली भेट; VIP नंबरसाठी मोजले ३१ लाख
9
भारतात राहणारे सर्वच हिंदू; मुस्लीम आणि ख्रिश्चन आपल्याच पूर्वजांचे वंशज, काय म्हणाले सरसंघचालक मोहन भागवत
10
तुमच्या कारमधील परफ्यूम दरवळतोय पण ठरतोय 'सायलेंट किलर'! श्वास आणि मायग्रेनचा गंभीर धोका
11
Nuclear warfare: भविष्य स्फोटक आहे...
12
एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंना भाजपाचा मोठा धक्का; २ मोठ्या नेत्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार
13
अर्धा तास तडफडला! फी न भरल्याने प्राध्यापकाने केला अपमान, विद्यार्थ्याने कॅम्पसमध्ये स्वतःला पेटवले
14
"तुमच्यातले शारीरिक संबंध कसे आहेत?", आंतरधर्मीय लग्न करताना मराठी गायिकेला आईने विचारलेला बोल्ड प्रश्न
15
सोनं की रिअल इस्टेट? गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय ठरेल जास्त फायदेशीर? तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला
16
मराठी अभिनेत्रीला डेट करतोय सुनील शेट्टीचा लेक अहान; कोण आहे ती सुंदरा?
17
जेल की रिसॉर्ट? ISIS रिक्रूटर आणि सीरियल किलरकडे मोबाईल; अधिकाऱ्यांच्या मदतीने कैद्यांची मजा
18
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
19
प्रदूषणकारी रसायनांचे उत्पादन करणारा कारखाना रत्नागिरीच्या लोटे वसाहतीत
20
हत्येनंतर शीर अन् धड वेगळे केले, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून फरार; अखेर १६ वर्षांनी आरोपीला अटक

शहाद्यात दिवसभर शोकाकूल वातावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2019 12:58 IST

ईश्वर पाटील ।  लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : शिंदखेडा तालुक्यातील निमगूळ गावालगत रविवारी साडेदहा ते पावणे अकरा वाजेच्या दरम्यान ...

ईश्वर पाटील । लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : शिंदखेडा तालुक्यातील निमगूळ गावालगत रविवारी साडेदहा ते पावणे अकरा वाजेच्या दरम्यान औरंगाबाद-शहादा या बसला शहाद्याकडून दोंडाईचाकडे जाणा:या कंटेनरने जोरदार धडक दिल्याने बसमधील 12 प्रवासी ठार तर 25 जण जखमी झाल्याची घटना घडली. हृदयाला हेलावणा:या या घटनेमुळे शहादा शहर व परिसरात सोमवारी दिवसभर शोकाकूल वातावरण होते.साध्वी भगिनींच्या भेटीनंतरभावाचा करुण अंतशहादा शहरातील श्री किराणा दुकानाचे मालक बन्सीलाल बुधमल नहाटा यांना दोन मुली व एक मुलगा असा परिवार आहे. चार वर्षापूर्वी नहाटा कुटुंबातील दोन्ही मुलींनी दीक्षा घेतली आहे तर मुलगा सुयोग बन्सीलाल नहाटा याने चार्टर्ड अकाऊंटंटची पदवी प्राप्त केली होती. सुयोगने नोकरी न करता व्यवसाय सांभाळावा अशी वडिलांची इच्छा होती.सध्या चातुर्मासनिमित्त विविध ठिकाणी कार्यक्रम सुरू आहेत. साध्वी असलेल्या दोन्ही बहिणी नरडाणा येथे आल्याची माहिती मिळाल्याने सुयोग हा रक्षाबंधनानिमित्त त्यांना भेटायला गेला होता. तेथून परत येत असताना दोंडाईचा येथून तो शहाद्याकडे येण्यासाठी या बसमध्ये बसला. चालकाच्या साईडला पाचव्या सीटवर तो बसला होता. मात्र काही वेळातच काळाने त्याच्यावर झडप घातली व या अपघातात त्याचा मृत्यू झाला. कुटुंबातील कर्ता व एकुलता एक मुलगा हरपल्याने त्याचे आई-वडील सुन्न बसले होते.

काकू व पुतण्याच्या मृत्यूरक्षाबंधनाचा सण साजरा करून शहादा येथे परत येत असताना तेजस जगदीश भावसार (14) व वृषाली दीपक भावसार (38) या काकू-पुतण्याला आपला जीव अपघातात गमवावा लागला.  निर्मळ व मनमिळावू स्वभावाच्या वृषाली भावसार यांनी येथील व्हालंटरी माध्यमिक विद्यालयात 1998 ते 2004 र्पयत संगणक शिक्षिका म्हणून काम केले. त्यानंतर 2004 पासून त्या माध्यमिक शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. अजूनर्पयत त्या विना अनुदानीत शाळेत केवळ मानधनावर काम करीत होत्या. यंदा त्यांना व्यवस्थापन मंडळ कनिष्ठ महाविद्यालयाकडे वर्ग करणार होते पण तत्पूर्वीच या अपघातात त्यांची प्राणज्योत मावळली. त्यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने खूप परिश्रम घेऊन त्यांनी नोकरी करत असतानाच स्वत:चे शिक्षण केले. शिरपूर येथे ये-जा करून त्यांनी बी.एड. केले. आयुष्यात काहीतरी करावं म्हणून त्या नेहमी वेगवेगळ्या परीक्षा देत होत्या. एका शासकीय विभागाची परीक्षा त्या नुकतीच उत्तीर्ण झाल्या होत्या. रक्षाबंधनानिमित्त त्या नाशिक येथे मोठय़ा भावाकडे व तेथून जळगावला लहान भावाकडे गेल्या होत्या. सोमवारी शाळा असल्याने रविवारी त्या जळगाव येथून रेल्वेने दोंडाईचा येथे आल्या. त्यांचे दीर जगदीश भावसार, दीराणी व पुतण्या तेजस हेसुद्धा अमळनेर येथे रक्षाबंधनासाठी गेले होते. ते अमळनेर येथून याच रेल्वेने दोंडाईचा येथे आले. त्यांच्यासोबत वृषाली भावसार ह्या दोंडाईचा येथून याच बसमध्ये बसल्या. पुतण्या तेजसला वृषाली यांनी आपल्याजवळ बसवून घेतले तर दीर व दीराणी हे वाहकाच्या मागील सीटवर बसले. मात्र बसला झालेल्या अपघातामुळे वृषाली भावसार व पुतण्या तेजसचा  हा प्रवास अखेरचा ठरला. त्यांच्या अपघाती निधनाने संपूर्ण व्हालंटरी शाळेवर दु:खाचे सावट पसरले. जगदीश भावसार हे रिक्षा चालवून उदरनिर्वाह करतात. त्यांचे तूप बाजारात वास्तव्य आहे. तेजस हा आठवीच्या वर्गात शिक्षण घेत होता.  वृषाली भावसार यांच्या एकुलत्या एक मुलाचे नुकतेच अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण झाल्याने 13 ऑगस्ट रोजी पुणे येथे एका खाजगी कंपनीत नुकतीच नोकरी मिळाली आहे. त्यांचे पती दीपक भावसार हे शहादा येथेच खाजगी नोकरी करतात. वृषाली भावसार यांची अंत्ययात्रा दुपारी 12 वाजता स्वामी विवेकानंद नगरमधील राहत्या घरुन काढण्यात आली. त्या विद्यार्थीप्रिय शिक्षिका असल्याने विद्यार्थी-विद्यार्थिनींनाही रडू कोसळले. सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांचा मोठा सहभाग असायचा. त्या भावसार महिला मंडळाच्या पदाधिकारीही होत्या. 

प}ी व मुलाचा डोळ्यादेखत मृत्यूशहादा येथील जुनी वसंतराव नाईक माध्यमिक विद्यालय परिसरातील रहिवासी व एस.टी. बसचालक श्रीराम वंजारी हे अमळनेर येथून प}ी व मुलासोबत येत होते. त्यांच्या पत्नी प्रेरणा ह्या अमळनेर येथे मुलासह रक्षाबंधन सणासाठी गेल्या होत्या. त्यांना घेऊन श्रीराम वंजारी हे प}ी प्रेरणा व मुलगा सौरभसह तिन्ही जण दोंडाईचा येथून औरंगाबाद-शहादा बसमध्ये बसले.  बसमध्ये प्रवासी संख्या जास्त असल्याने प्रेरणा वंजारी व सौरभ वंजारी हे चालकाच्या पाठीमागील सीटवर तर श्रीराम वंजारी हे वाहक प्रवाशांना तिकीटे देत असल्याने त्यांच्या जागेवर बसले होते. या अपघातात काळाने झडप घालून आई व मुलाचा मृत्यू झाला. प}ी व मुलाचा बसमध्ये अडकलेला मृतदेह वंजारी यांनी स्वत:च काढला. त्यावेळी तेथे उपस्थितांचे हृदय हेलावून गेले होते. या दोघांचे मृतदेह घरी आणल्यानंतर श्रीराम वंजारी, त्यांची मुलगी व नातेवाईकांनी अक्षरश: हंबरडा फोडला.कर्तव्याला प्राधान्य देणा:याबस चालकाचा अकाली मृत्यू अपघातग्रस्त बसचे चालक मुकेश नगीन पाटील (36) यांचे शहादा शहरातील बेलदार गल्लीतील पत्नी, मुलगा व मुलगीसह वास्तव्य होते. एस.टी. महामंडळातील तरुण, सुस्वभावी, निव्र्यसनी व कर्तव्याला प्रथम प्राधान्य देणारा चालक म्हणून मुकेश पाटील यांची ओळख होती. रविवारी रात्री सव्वादहा वाजेच्या सुमारास ते औरंगाबाद-शहादा बस घेऊन दोंडाईचा येथून निघाले. निमगूळ गावाच्या अलिकडे भरधाव वेगाने येणा:या कंटेनरने बसला समोरुन धडक दिल्याने मुकेश पाटील यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांचा मृतदेह घरी आणल्यानंतर पत्नी, मुलगा, मुलगी व नातेवाईकांनी हंबरडा फोडला होता.

शिस्तप्रिय विद्याथ्र्याच्या मृत्युनेकॉलेजवर शोककळाशहादा येथील पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयातील अंतिम वर्षात शिक्षण घेणारा अस्तिक आनंद वाघचौरे (21) याचाही या अपघातात मृत्यू झाला. तो मु.खंडपे, पो.कोलथान, ता.मुरबाड, जि.ठाणे येथील रहिवासी होता. तो रक्षाबंधन सणासाठी आपल्या घरी गेला होता. रविवारी तो ठाणे येथून शहाद्याकडे येत असताना धुळ्याहून औरंगाबाद-शहादा बसमध्ये बसला. मात्र निमगूळजवळ या बसला झालेल्या अपघातात त्याचा मृत्यू झाला. घटना कळताच औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.पी. पवार, कर्मचारी व मित्र परिवार सोमवारी सकाळी दोंडाईचा येथील ग्रामीण रुग्णालयात पोहोचले. शवविच्छेदनानंतर त्याचा मृतदेह नातेवाईकांकडे सुपूर्द करण्यात आला. त्याच्यावर ठाणे येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. अस्तिक हा अत्यंत शिस्तप्रिय व हुशार विद्यार्थी होता. त्याच्या मनमिळावू स्वभावामुळे मित्र परिवारही मोठा होता. मात्र त्याच्या मृत्यूमुळे महाविद्यालयात शोककळा पसरली. सोमवारी अस्तिक वाघचौरे यास महाविद्यालय परिसरात श्रद्धांजली वाहण्यात आली.या अपघातात ठार झालेले शिरुड दिगर, ता.शहादा येथील संजय ताराचंद अलकरी हे लोकनायक जयप्रकाश नारायण सूतगिरणीत कामाला होते.