निसरपूरजवळ गायींच्या धडकेत मोटारसायकलस्वार ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2020 13:11 IST2020-07-28T13:11:18+5:302020-07-28T13:11:24+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ब्राह्मणपुरी : मध्य प्रदेशातील निसरपूर (मेलन) येथे गायींच्या धडकेत मोटारसायकलस्वार ठार झाल्याची घटना घडली. या घटनेत ...

निसरपूरजवळ गायींच्या धडकेत मोटारसायकलस्वार ठार
लोकमत न्यूज नेटवर्क
ब्राह्मणपुरी : मध्य प्रदेशातील निसरपूर (मेलन) येथे गायींच्या धडकेत मोटारसायकलस्वार ठार झाल्याची घटना घडली. या घटनेत एक जण जखमीही झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
शहादा तालुक्यातील जावदेतर्फे हवेली येथील युवक पंकज प्रल्हाद बिरारे (३८) हे अंकलेश्वर येथे उदरनिर्वाहासाठी गेले होते. परंतु कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे कंपनी बंद झाल्याने ते गावी परतले होते. गावी आल्यानंतर उदरनिर्वाहासाठी पंकज बिरारे यांनी भाजीपाला विक्रीचा व्यवसाय सुरू केला होता. जावदे येथून खेतिया येथे भाजीपाला घेण्यासाठी जात असताना मध्य प्रदेशातील निसरपूर (मेलन) येथे अचानक समोरून मोटारसायकलीवर गायी धावून आल्याने मोटारसायकल स्लीप झाल्याने पंकज बिरारे यांना गंभीर दुखापत होऊन ते जागीच ठार झाले. तर सोबत असलेले संजय साळवे हे जखमी झाले. साळवे यांना तात्काळ शहादा येथील रुग्णालयात दाखल करून उपचार करण्यात आले. पंकज बिरारे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली असा परिवार आहे. दरम्यान, या घटनेत युवकाचा मृत्यू झाल्याने जावदेतर्फे हवेली परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.