चारचाकीच्या धडकेत मोटारसायकलस्वार जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2020 12:10 IST2020-06-24T12:10:29+5:302020-06-24T12:10:39+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क ब्राह्मणपुरी : भरधाव वेगातील कारने मोटारसायकलला धडक दिल्याने युवक गंभीर जखमी झाल्याची घटना ब्राह्मणपुरी ता़ शहादा ...

Motorcyclist injured in four-wheeler collision | चारचाकीच्या धडकेत मोटारसायकलस्वार जखमी

चारचाकीच्या धडकेत मोटारसायकलस्वार जखमी

लोकमत न्यूज नेटवर्क
ब्राह्मणपुरी : भरधाव वेगातील कारने मोटारसायकलला धडक दिल्याने युवक गंभीर जखमी झाल्याची घटना ब्राह्मणपुरी ता़ शहादा येथे मंगळवारी सायंकाळी पाच वाजता घडली़
ब्राह्मणपुरी येथील भय्या रामलाल ठाकरे (२१) हा युवक मंगळवारी सायंकाळी कामावरुन घरी आला़ दरम्यान त्याची एमएच-१४-डीए-९११९ ही दुचाकी घराजवळ लावत असताना भरधाव वेगातील कारने त्याला धडक दिली़ यात भय्या ठाकरे हा जखमी झाला़ धडक दिल्यानंतर कारसह चालक फरार झाला़ पोलिस पाटील रविंद्र पवार यांच्यासह ग्रामस्थ याठिकाणी दाखल झाले होते़ जखमीला म्हसावद ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे़ पोलीस कर्मचारी अजय पवार यांनी धडक देणाऱ्या वाहनाचा पाठलाग केला होता़ परंतू तो चालक वाहनासह पसार झाला़ दरम्यान रात्री उशिरापर्यंत शहादा पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात येत होती़

Web Title: Motorcyclist injured in four-wheeler collision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.