वाहनाच्या धडकेत मोटारसायकलस्वार ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 11:33 IST2019-04-08T11:32:49+5:302019-04-08T11:33:14+5:30
एक जखमी : तळोदा-अक्कलकुवा दरम्यान अपघात

वाहनाच्या धडकेत मोटारसायकलस्वार ठार
नंदुरबार : बºहाणपूर-अंकलेश्वर राज्यमार्गावर तळोदा ते अक्कलकुवा दरम्यान अज्ञात वाहनाच्या धडकेत मोटारसायलकस्वार जागीच ठार झाला़ धडक देणाऱ्या वाहनाने लगत चालणाऱ्या पादाचाºयासही धडक देऊन जखमी केले़ ही घटना शुक्रवारी रात्री ९़३० वाजेच्या सुमारास घडली़
शेलवाई येथील मनेश जोलू पाडवी (४२) हे जीजे २२ एफ ९५६१ या दुचाकीने अक्कलकुवा येथून रात्री शेलवाई गावाकडे जात होते़ दरम्यान त्यांची मोटारसायकल रामपूर फाट्याजवळ आली असताना अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीस धडक दिली़ धडकेनंतर जमिनीवर पडलेल्या मनेश पाडवी यांच्या अंगावरुन वाहन चालून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला़ अपघाती वाहनाने पुढे पायी जाणारे मगन नाईक (पूर्ण नाव माहित नाही) यांनाही धडक दिल्याने ते जखमी झाले़ यानंतर वाहनचालक घटनास्थळावरुन पसार झाला़ याबाबत रमेश जोलू वळवी यांच्या फिर्यादीवरुन तळोदा पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल असून तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल जाधव करत आहेत़