मुलांचा विरह सहन झाल्याने मातेची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2019 17:58 IST2019-04-07T17:57:55+5:302019-04-07T17:58:08+5:30
कौटूंबिक वाद : आंबापाणी येथील घटना

मुलांचा विरह सहन झाल्याने मातेची आत्महत्या
नंदुरबार : शहादा तालुक्यातील आंबापाणी येथे माहेरी आलेल्या विवाहितेने मुलांचा विरह सहन झाल्याने आत्महत्या केली़ ही घटना गुरुवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास घडली होती़
नवीबाई वसन वसावे (२६) ह्या गेल्या १० दिवसांपासून आंबापाणी येथे माहेरी आल्या होत्या़ दरम्यान गुरुवारी सकाळी त्यांचे पती त्यांना धडगाव येथे सासरी घेऊन जाण्यासाठी आले होते़ यावेळी त्यांनी जाण्यास नकार दिल्याने वसन वसावे यांनी सात वर्षीय मुलगा आणि पाच वर्षीय मुलगी या दोघांना सोबत घेत गावाचा रस्ता धरला़ प्रसंगी दोघांमध्ये वादही झाला होता़ यातून रात्री नवीबाई यांनी गळफास घेत आत्महत्या केली़ याबाबत म्हसावद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद आहे़