भोगवाडे येथे माता राणी काजल पूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2020 13:48 IST2020-02-24T13:48:03+5:302020-02-24T13:48:21+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क धडगाव : याहा मोगी माता यात्रेच्या मुहुर्तावर भोगवाडे बु. ता.धडगाव येथे निसर्ग देवता राणीकाजल मातेचे पूजन ...

Mother queen Kajal Pujan at Bhogwade | भोगवाडे येथे माता राणी काजल पूजन

भोगवाडे येथे माता राणी काजल पूजन

लोकमत न्यूज नेटवर्क
धडगाव : याहा मोगी माता यात्रेच्या मुहुर्तावर भोगवाडे बु. ता.धडगाव येथे निसर्ग देवता राणीकाजल मातेचे पूजन करण्यात आले. ही पूजा गाव पुंजारा माकत्या बाबा यांच्या हस्ते करण्यात आली.
यावेळी उपसरपंच सुकदेव पावरा, ग्रामपंचायत सदस्य किसन पावरा, पोलिस पाटील थिक्या पावरा, कारभारी जोरदार पावरा, फोपऱ्या पावरा यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते. शेकडो वर्षापूर्वी पासून या निसर्ग देवतेचे पुजन या ठिकाणी होत आहे. याच बरोबर याहा मोगी माता यात्रेच्या मुहुर्तावरही येथे पुजा होत आहे.
या पुजेत खरिप हंगामापूर्वी गाव पुंजारांकडून मातेला वर्षभर गावात सुखशांती लाभू दे, चांगला पाऊस पडू दे, शेतकऱ्यांचे सर्व पिके निरोगी राहू दे, चांगले अन्नधान्य पिकू दे व गाव परिसरातील सर्व सजीवांना निरोगी राहु दे, असे साकडे घातले जात आहे. या कार्यक्रमानंतर गावात अन्य कायक्रम देखील घेण्यात आले. त्यात सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.

Web Title: Mother queen Kajal Pujan at Bhogwade