शहाद्यात विवाहितेस सासरच्यांची मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2019 12:04 IST2019-12-20T12:04:26+5:302019-12-20T12:04:54+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहादा शहरातील रामनगर भागात विवाहितेस पतीसह सासरच्यांनी बेदम मारहाण करत जखमी केल्याची घटना १२ ...

शहाद्यात विवाहितेस सासरच्यांची मारहाण
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शहादा शहरातील रामनगर भागात विवाहितेस पतीसह सासरच्यांनी बेदम मारहाण करत जखमी केल्याची घटना १२ डिसेंबर रोजी घडली होती़ विवाहितेवर उपचार पूर्ण करण्यात आल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
सोनालीबाई दिनेश कोळी असे मारहाण झालेल्या विवाहितेचे नाव आहे़ त्यांना पती दिनेश सुदाम कोळी, सासू बेबीबाई, छायाबाई वाल्मिक कोळी, नर्मदबाई कोळी, वाल्मिक कोळी, मुकेश कोळी व अमोल कोळी यांनी घरकाम येत नाही तसेच घरात उद्धट बोलते या कारणावरुन १२ डिसेंबर रोजी रामनगरातील घराच्या अंगणात बेदम मारहाण करत शिवीगाळ करुन जिवे ठार मारण्याची धमकी दिली होती़ मारहाणीत जखमी झाल्याने सोनाली यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते उपचार पूर्ण झाल्यानंतर त्यांनी पोलीसात फिर्याद दिली़
सोनाली कोळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन पतीसह आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस नाईक गोसावी करत आहेत़