जिल्हा रुग्णालयात परिचारिकेस रुग्णासह आई व आजीची मारहाण

By मनोज शेलार | Updated: April 14, 2023 19:38 IST2023-04-14T19:38:21+5:302023-04-14T19:38:32+5:30

या वादातून तिघांनी पूजा कापसे यांना शिवीगाळ करत मारहाण केली

Mother and grandmother were beaten up along with the patient in the district hospital | जिल्हा रुग्णालयात परिचारिकेस रुग्णासह आई व आजीची मारहाण

जिल्हा रुग्णालयात परिचारिकेस रुग्णासह आई व आजीची मारहाण

नंदुरबार - जिल्हा रुग्णालयात टीबी वॉर्डात काम करणाऱ्या अधिपरिचारिकेस महिला रुग्ण व तिच्या आई आणि आजीने मारहाण केल्याची घटना घडली. याप्रकरणी शहर पोलिसात मारहाण व शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस सुत्रांनुसार, शासकीय रुग्णालयातील टीबी वॉर्डात अधिपरिचारिका पूजा सुनील कापसे या काम करत होत्या. तेथे दाखल असलेल्या तबस्सूम शरीफ शहा या उपचार घेत असताना शहा यांनी व त्यांची आई व आजी यांनी पूजा कापसे यांच्याशी वाद घातला. या वादातून तिघांनी पूजा कापसे यांना शिवीगाळ करत मारहाण केली. हात पिळून खाली पाडले व धमकी दिली. याप्रकरणी पूजा कापसे यांनी फिर्याद दिल्याने तबस्सूम शरीफ शहा (३५) व इतर दोघांविरुद्ध नंदुरबार शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक पोलिस निरीक्षक नंदा पाटील करत आहे.

Web Title: Mother and grandmother were beaten up along with the patient in the district hospital