सर्वाधिक मतदान होणा:या केंद्रांना गौरविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2019 12:11 IST2019-09-08T12:11:03+5:302019-09-08T12:11:08+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : लोकसभा निवडणुकीत सर्वात कमी मतदान झालेल्या 20 टक्के मतदान केंद्रांपैकी ज्या मतदान केंद्रांवर विधानसभा ...

Most voted: These centers will be honored | सर्वाधिक मतदान होणा:या केंद्रांना गौरविणार

सर्वाधिक मतदान होणा:या केंद्रांना गौरविणार

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : लोकसभा निवडणुकीत सर्वात कमी मतदान झालेल्या 20 टक्के मतदान केंद्रांपैकी ज्या मतदान केंद्रांवर विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक मतदान होईल अशा तीन     केंद्रावरील केंद्रस्तरीय अधिका:यांना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांच्या हस्ते प्रमाणपत्र आणि पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे.
विधानसभा निवडणुकीत कोणीही मतदार मतदानापासून वंचित राहू नये यासाठी जिल्हा निवडणूक प्रशासनाने जिल्हाधिका:यांच्या मार्गदर्शनाखाली प्रय} सुरू केले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून मतदार जागृतीवर भर देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदार संघातील निवडणूक    निर्णय अधिका:यांना याबाबत सूचित   करण्यात आले आहे. मतदान प्रक्रियेत मतदान केंद्रस्तरीय अधिका:यांची महत्वाची भूमिका लक्षात घेता त्यांचा मतदार जागृतीच्या उपक्रमात सहभाग वाढविण्यासाठी जिल्हाधिका:यांनी त्यांना प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला आहे.
केंद्रस्तरीय अधिका:यांनी अधिकाधिक मतदान होण्यासाठी आवश्यक सर्व प्रय}    करावे. मतदारांना मतदान प्रक्रियेची माहिती देण्यात येऊन त्यांना मतदानासाठी प्रोत्साहित करावे. त्यासाठी इतर विभागांचे  सहकार्यदेखील घेण्यात यावे. मतदान केंद्रावरील सुविधांबाबत नागरिकांना अवगत करावे. दिव्यांग मतदारांशी संपर्क साधून त्यांना आवश्यक सहकार्य       करावे, अशा सूचना डॉ.भारुड यांनी दिल्या आहेत.
लोकसभा निवडणुकीत कमी मतदान झालेल्या मतदान केंद्रापैकी ज्या मतदान केंद्रात सर्वाधिक मतदान होईल अशा प्रत्येक विधानसभा मतदार संघातील तीन केंद्राच्या बीएलओंना गौरविण्यात येईल व त्यापैकी सर्वाधिक मतदान झालेल्या तीन केंद्रावरील बीएलओंना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या हस्ते जिल्हास्तरावर गौरविण्यात येणार आहे. यासाठी 20 टक्के मतदान केंद्रांची यादी काढण्यात आली असून त्यावर काम सुरू असल्याचे सांगण्यात आले. 
यामुळे कर्मचा:यांना प्रोत्साहन मिळून जास्तीत जास्त मतदान होण्यासाठी मदत मिळणार असल्याचे निवडणूक विभाग आणि जिल्हा प्रशासनाचे प्रय} आहेत. 

मतदार जागृतीसाठी..
मतदार जागृतीसाठी विविध पातळीवर प्रय} केले जाणार आहेत. त्यासाठी कला पथकांची मदत घेतली जाणार आहे. महाविद्यालयीन विद्याथ्र्याना देखील प्रोत्साहीत केले जाणार आहे. विशेषत: यापूर्वी ज्या मतदान केंद्रात कमी मतदान झाले तेथे विशेष उपक्रमावर भर राहणार आहे.
 

Web Title: Most voted: These centers will be honored

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.