शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
4
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
5
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
6
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
7
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
8
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
9
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
10
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
11
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
12
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
13
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
14
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
15
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
18
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
19
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
20
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
Daily Top 2Weekly Top 5

६० पेक्षा अधीक वयाच्या व्यक्तींचे सर्वाधिक मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 12:44 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोनामुळे जिल्ह्यात ६० वर्ष वयापेक्षा अधीक वय असलेल्या व्यक्तींचा सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. तर ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : कोरोनामुळे जिल्ह्यात ६० वर्ष वयापेक्षा अधीक वय असलेल्या व्यक्तींचा सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. तर शून्य ते २४ वयोगटातील एकाचाही मृत्यूत समावेश नाही. दरम्यान, जिल्ह्यात मृत्यूदर कमी झाला असून कोरोनामुक्तीचा दर देखील वाढला आहे. नंदुरबारात कोरोनाचा पहिला रुग्ण १८ एप्रिल रोजी आढळला होता. त्यानंतर महिनाभर बाधितांची संख्या फारशी वाढली नाही. परंतु जून महिन्यापासून ते सप्टेंबर महिन्यापर्यंत बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली. दिवाळीच्या आधी देखील संख्या कमी झाली, परंतु दिवाळीनंतर त्यात पुन्हा वाढ होऊ लागली आहे. आता शाळा, महाविद्यालये सुरू झाली आहेत. सर्व व्यवहार रुळावर आले आहेत. असे असतांना रुग्ण संख्या देखील दररोज ३० पर्यंत जात आहे. जिल्ह्यात मृत्यू दर हा अडीच ते तीन टक्केच्या आत राहिला आहे. मृत्यू झालेल्यांमध्ये सर्वाधिक पुरुष आहेत. वयोगटाचा विचार करता शून्य ते २४ वयोगटातील मृत्यू संख्या शून्य आहे. ४६ ते ६० आणि ६० वर्ष वयावरील बाधितांचा सर्वाधिक मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या संदर्भातील भिती आता काहीशी कमी झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. व्यवहार सुरळीत होऊ लागला असून अनेकांच्या नोकऱ्या, व्यवसाय यावर गदा आलेली आहे. त्यामुळे रोजगाराचा शोध अद्यापही काही ठिकाणी सुरू असल्याचे दिसून येत आहे. 

होम आयशोलेशन बंद...रुग्ण संख्या वाढत होती त्यावेळी शासकीय यंत्रणेवर ताण पडत होता. रुग्णांना बेड मिळत नव्हते. क्वॅारंटाईन केंद्रे हाऊसफूल्ल होत होती. त्यामुळे शासनाने कमी लक्षणे व ज्यांना लक्षणेच नाहीत अशा रुग्णांना घरीच आयशोलेशन होऊन उपचार घेण्याची सुविधा उपलब्ध करून दिली होती. परंतु त्याचा दूरपयोग होऊ लागला होता. बाधीत व्यक्ती परिसरात फिरण्यासह त्याच्याकडून काळजी घेतली जात नव्हती. अशातच रुग्ण संख्या देखील वाढू लागल्याने शेवटी होम आयशोलेशनचा निर्णय रद्द करावा लागला. त्यामुळे आता बाधीत प्रत्येक रुग्णाला शासकीय रुग्णालय किंवा खाजगी रुग्णालयात उपचार घ्यावा लागतो आहे. 

जुलै, ॲागस्ट, सप्टेंबरमध्ये सर्वाधिक मृत्यूगेल्या ११ महिन्याच्या काळात सर्वाधिक मृत्यू संख्या ही जुलै ते ॲागस्ट महिन्यात झाली आहे. त्यानंतर मध्यंतरी मृत्यू संख्या कमी झाली परंतु डिसेंबर व जानेवारी महिन्यात त्यात पुन्हा वाढ झाली. जुलै महिन्यात ३०, ॲागस्ट महिन्यात ४८, सप्टेंबर महिन्यात ४० जणांचा मृत्यू झाला होता. डिसेंबर महिन्यात १८ तर जानेवारी महिन्यात ३३ जणांचाा मृत्यू झाला आहे. मृत्यू संख्या सर्वाधिक ही शहादा व नंदुरबार तालुक्यातील आहे तर सर्वात कमी धडगाव व अक्कलकुवा तालुक्याील असल्याचे चित्र आहे.