मॉर्निग वॉक करणाऱ्यांना २ हजाराचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2020 12:34 IST2020-04-14T12:33:15+5:302020-04-14T12:34:13+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोनाचा संसर्ग होवू नये यासाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे़ या काळातही मॉर्निंग वॉक ...

Morning walker fined 3 thousand | मॉर्निग वॉक करणाऱ्यांना २ हजाराचा दंड

मॉर्निग वॉक करणाऱ्यांना २ हजाराचा दंड

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : कोरोनाचा संसर्ग होवू नये यासाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे़ या काळातही मॉर्निंग वॉक करण्यासाठी घराबाहेर पडणाºया २० जणांवर पोलीसांनी कारवाई केली होती़ या सर्वांना नंदुरबार न्यायालयाने प्रत्येकी दोन हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली आहे़
केंद्र आणि राज्य सरकारने लॉकडाऊनची घोषणा केली असताना १० एप्रिल रोजी पहाटे पाच ते साडेसात या वेळेत शहरातील विविध भागात मॉर्निंग वॉक करणाºया २० जणांवर पोलीसांनी कारवाई केली होती़ यात विलास गणपतसिंग राजपूत रा़ हुडको कॉलनी, सुधीर व्यंकटराव गावीत रा़ गिरीकुंज सोसायटी, लताबाई एकनाथ अभंगे रा़ जगतापवाडी, माया युवराज मराठे, जयश्री देविदास मराठे दोघे रा़ शंकर नगर, शगुप्ता तन्वीर पिंजारी रा़ करण चौफुली, छाया प्रकाश माळी रा़ सुशिला लक्ष्मण घरटे, मयूरी विशाल घरटे दोघी रा़ कोकणी हिल, तबस्सुम सिराज खाटीक रा़ बागवान गल्ली, दिलीप नथ्थू दुसाणे रा़ सोनाबाई नगर, विजय दशरथ पाटील रा़ बन्सीलाल नगर, वैभव जगन्नाथ भारती रा़ कोरीट नाका, संजय हरीभाऊ मराठे रा हरीभाऊ नगर, आनंदराव सुकराम पाटील रा़ कामनाथ नगर, चतुर कौतिक धनगर रा़ गांधीनगर, वसंत ओंकार चौधरी रा़ कोहीनूर टॉकिज जवळ, सुभाष नारायण वाडिले रा़ जुनी भोई गल्ली, नाना भगवान जोशी रा बन्सीलाल नगर व राजेंद्र आनंदराव पाटील रा़ रघुवंशी नगर यांचा समावेश होता़ संचारबंदी असतानाही घराबाहेर पडून कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हे दाखल होते़ सोमवारी सर्वांना मुख्य न्यायदंडाधिकारी व्ही़जे़ चव्हाण, प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस़ए़विराणी यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले होते़ त्यांच्यावर गुन्हा शाबित झाल्याने न्यायालयाने सर्व २० जणांना २ हजारांचा दंड सुनावला़ दंड न भरल्यास ५ दिवसांच्या साध्या कैदेची शिक्षा सुनावली़
सर्व २० आरोपींविरोधात सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे व पोलीस उपनिरीक्षक सुनील बिºहाडे यांनी दोषारोपपत्र सादर केले होते़ दोघांचे पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत व अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी यांनी कौतूक केले आहे़
दरम्यान न्यायालयाने शिक्षा सुनावताना कोरोना विषाणूचा सार्वजनिक ठिकाणी संसर्ग टाळता यावा म्हणून नागरिकांनी तोंडावर मास्क किंवा रुमाल बांधणे कायद्यानुसार बंधनकारक आहे़ यामुळे बेजबाबदारपणे वागून कायद्याचे उल्लघन करु नये व कोरोना गंभीर आजार असल्याने कायद्याचे पालन करावे़

Web Title: Morning walker fined 3 thousand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.