सफाई कामगारांच्या कामबंद आंदोलनात पाचशेहून अधिक कामगारांचा सहभाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:36 IST2021-08-14T04:36:09+5:302021-08-14T04:36:09+5:30
राज्यातील सफाई कामगारांच्या विविध मागण्या आहेत. या मागण्यांचा पाठपुरावा करण्यासाठी संघटनेतर्फे मुख्यमंत्र्यांसह राज्यातील १२ मंत्र्यांना निवेदन देण्यात आले. परंतु, ...

सफाई कामगारांच्या कामबंद आंदोलनात पाचशेहून अधिक कामगारांचा सहभाग
राज्यातील सफाई कामगारांच्या विविध मागण्या आहेत. या मागण्यांचा पाठपुरावा करण्यासाठी संघटनेतर्फे मुख्यमंत्र्यांसह राज्यातील १२ मंत्र्यांना निवेदन देण्यात आले. परंतु, कार्यवाही न झाल्याने ९ ऑगस्टला राज्यात पालिका सफाई कामगारांचा एक दिवसाचा बंद पुकारण्यात आला. यात नंदुरबार जिल्ह्यातील चारही पालिकेतील कामगार सहभागी झाले होते.
पालिका क्षेत्रातील खाजगी सफाई ठेका बंद करण्यात यावा, सफाई कामगारांची नवीन पदे निर्माण करावी. सफाई कामगारांसाठी दादासाहेब चांगले यांच्या नावाने स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य योजनेची काटेकोर अंमलबजावणी करण्यात यावी. कामगारांना घरे बांधून देण्यात यावी. १९९१ पूर्वी कोर्ट आदेशाने नियुक्त झालेल्या कामगारांना लाड समितीचा लाभ मिळावा. २००५ नंतर नियुक्त झालेल्या कामगारांना निवृत्तीवेतन मिळावे. यासह विविध मागण्या करण्यात आल्याची माहिती कुंदन थनवार यांनी दिली.