माकपातर्फे तळोदा तहसील कार्यालयावर मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2018 11:50 IST2018-11-17T11:50:05+5:302018-11-17T11:50:11+5:30
तळोदा : रेशनवरील रोख रक्कम बंद करून प्रत्येक कुटुंबाला दरमहा धान्य द्यावे, शासनाच्या नवीन अधिनियमानुसार शेतकरी, शेतमजुरांना तीन हजार ...

माकपातर्फे तळोदा तहसील कार्यालयावर मोर्चा
तळोदा : रेशनवरील रोख रक्कम बंद करून प्रत्येक कुटुंबाला दरमहा धान्य द्यावे, शासनाच्या नवीन अधिनियमानुसार शेतकरी, शेतमजुरांना तीन हजार रूपये पेन्शन देवून दुष्काळी परिस्थितीत शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी आदी विविध मागण्यांसाठी माकपाच्या तळोदा तालुका शाखेकडून शुक्रवारी तहसील कार्यालयावर मोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
दरम्यान, तहसीलदार योगेश चंद्रे यांनी मोर्चेक:यांचे निवेदन स्विकारून स्थानिक पातळीवरील प्रश्नाबाबत तातडीने कार्यवाही करून इतर मागण्याबाबत वरिष्ठांकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.
तळोदा तालुक्यात यंदा सरासरीच्या पेक्षाही कमी पजर्न्यमान झाले आहे. त्यामुळे 1972 पेक्षाही यंदा दुष्काळाची प्रचंड तीव्रता राहणार आहे. या दुष्काळी स्थितीत शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून शेतकरी, शेतमजूर आणि सामान्य जनतेस शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून लाभ द्यावा. रेशनचे धान्य रक्कम ऐवजी धान्य स्वरूपातच द्यावे. याशिवाय शेतक:यांना विनाविलंब कर्ज वाटप करावे आदी वेगवेगळ्या मागण्यांसाठी माकपाची तळोदा तालुका कमेटीच्या वतीने शुक्रवारी तळोदा तहसीलवर मोर्चा काढण्यात आला. मोर्चाची सुरूवात येथील दुध संघाच्या कार्यालयापासून करण्यात आली. बसस्थानक, तहसीलरोडमार्गे तहसील कार्यालयात नेण्यात आला. या वेळी एका शिष्ट मंडळाने तहसीलदारांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात 2017 च्या शासन आदेशानुसार शेतकरी शेतमजुरांना तीन हजार रुपये पेन्शन द्यावे, संजय गांधी, श्रावणबाळ, इंदिरा गांधी आदी योजनेचे पेन्शन वाढवावे, कजर्माफी झालेल्या शेतक:यांची यादी जाहीर करावी, शेतमालाला खर्च वजा जाता, दीडपट हमी भाव द्यावा, शासनाने तळोदा तालुका दुष्काळी जाहीर केल्यामुळे योजनांची तातडीने अंमलबजावणी करावी, भूगर्भातील पाण्याची पातळी वाढविण्यासाठी यंदा नाले खोलीकरण करून बंधारे मोठय़ा प्रमाणात बांधावे, ही कामे रोहयो अंतर्गत करण्यात यावे, नामंजूर करण्यात आलेले वनदाव्यांसाठी एकपुरावा ग्राह्य करून ती दावे तातडीने मंजूर करावी, पेसा कायद्यानुसार ग्रामसभेच्या ठरावानुसार पडीक व गायरान जमीन कसणा:या मजुरांची रक्कम रोहयोतून तातडीने द्यावी, अशा वेगवेगळ्या मागण्या करण्यात आल्या आहेत.
या मागण्याबाबत मोर्चेक:यांच्या शिष्टमंडळाने तहसीलदार योगेश चंद्रे यांच्याशी सविस्तर संवाद साधला. या वेळी चंद्रे यांनी स्थानिक पातळीवरील मागण्यांबाबत तातडीने कार्यवाही करून ज्या इतर मागण्या आहेत त्या वरिष्ठांकडे पाठपुरावा करण्याचे सांगितले. या वेळी पंचायत समितीचे सहायक गटविकास अधिकारी बी.आर. सोनवणे, नायब तहसीलदार श्रीकांत लोमटे, माकपाचे जयसिंग माळी, इंदिराबाई चव्हाण, अनिल ठाकरे, दयानंद चव्हाण, मंगलसिंग चव्हाण, रूबाबसिंग ठाकरे, कैलास चव्हाण, बाबुलाल नवरे, सुभाष ठाकरे, सुदाम ठाकरे, तापीबाई माळी, लक्ष्मण ठाकरे, मोगा भिल उपस्थित होते.