विद्यार्थी मृत्यूप्रकरणी धडगावात मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2018 12:23 IST2018-10-11T12:23:22+5:302018-10-11T12:23:27+5:30
योगेश पावराला न्याय द्या : विद्याथ्र्यासह पदाधिका:यांचा सहभाग

विद्यार्थी मृत्यूप्रकरणी धडगावात मोर्चा
धडगाव : जळगाव येथील शासकीय आदिवासी मुलांच्या वसतीगृहाच्या तिस:या मजल्यावरुन पडून मृ्त्यू झालेल्या योगेश पावरा याच्या मृत्यूची चौकशी करण्याच्या मागणीसह अधिका:यांच्या हलगर्जीपणाचा निषेध करत धडगाव येथे मोर्चा काढण्यात आला होता़ मोर्चात विद्याथ्र्यासह राजकीय पदाधिकारी, महिला, युवती आणि तालुक्यातील ग्रामस्थ सहभागी झाले होत़े
मयत योगेश आज:या पावरा याच्या मानसिंगपाडा ता़ धडगाव येथील घरापासून काढण्यात आला होता़ धडगाव शहरातील कृषी विभाग, कालुबाबा चौक, पाटीलबाबा चौक, मुख्य बाजारपेठेतून तहसील कार्यालयर्पयत काढण्यात आला़ यावेळी तहसीलदार यांना निवेदन देण्यात आल़े निवेदनात योगेश याने आत्महत्या केली नसून शासनाच्या बोगस कारभार आणि असुविधांचा तो बळी ठरला आह़े वसतीगृहात कार्यरत सर्व अधिकारी, कर्मचारी यांच्या हलगर्जीपणामुळे उच्चशिक्षित गरीब विद्याथ्र्याचा बळी गेला आह़े घटना झाल्यापासून प्रशासनाने कोणत्याही प्रकारची चौकशी केलेली नाही़ विद्यार्थी हा आदिवासी समाजाचा असल्यामुळे अधिकारी चौकशीकडे दुर्लक्ष करत आहेत़ याप्रकरणी दोषी असलेल्या संबधित अधिका:यांवर योग्य ती कारवाई करून योगेश पावरा या विद्याथ्र्यास न्याय मिळवून द्यावा, त्याच्या कुटूंबियांना 25 लाखांचे सानुग्रह अनुदान देण्यात यावे, कुटूंबातील एका सदस्याला शासकीय नोकरी देण्यात यावी, डीबीटीची योजना शासनाने रद्द करण्याचे आदेश द्यावे, दोषी अधिका:यांची चौकशी व्हावी आदी मागण्या केल्या आहेत़ हे निवेदन जिल्हाधिकारी, प्रकल्प अधिकारी आणि आदिवासी विकास विभागाला देण्यात येणार आह़े