भांडण सोडविण्यास गेलेल्या महिलेचा विनयभंग
By Admin | Updated: July 8, 2017 13:27 IST2017-07-08T13:27:59+5:302017-07-08T13:27:59+5:30
पाण्यात खेळणा:या मुलाला हटकले असता त्याचा राग येवून चौघांनी एकास बेदम मारहाण केली.

भांडण सोडविण्यास गेलेल्या महिलेचा विनयभंग
ऑनलाईन लोकमत
नंदुरबार, दि.8 - नदीच्या पाण्यात खेळणा:या मुलाला हटकले असता त्याचा राग येवून चौघांनी एकास बेदम मारहाण केली. शिवाय भांडण सोडविण्यास गेलेल्या महिलेचादेखील विनयभंग करण्यात आला. याप्रकरणी चौघांविरुद्ध तळोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तळोदा येथील अक्कलकुवा रस्त्यावरील खरडी नदीच्या पात्रात मनोज विक्रम बुवा यांचा भाचा खेळत होता. त्यावेळी जगन हरी भरवाड यांनी नदीपात्रात का खेळतो म्हणून विचारणा केली. त्यावरून बुवा आणि भरवाड यांच्यात वाद झाला. वादातून मारहाण झाली. रमेश रुपा भरवाड, जगा धुडा भरवाड, जगन हरी भरवाड आणि बोडय़ा हरी भरवाड सर्व रा.रामदेवनगर, भरवाडवाडा यांनी मनोज विक्रम बुवा यांना मारहाण केली. मध्यस्थी करण्यास आलेल्या 30 वर्षीय महिलेचा देखील विनयभंग करण्यात आला.
याबाबत मनोज बुवा यांनी फिर्याद दिल्याने रमेश भरवाड, जगा भरवाड, जगन भरवाड व बोडय़ा भरवाड यांच्याविरुद्ध तळोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.