शिवीगाळ करुन धमकी देऊन महिलेचा विनयभंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2019 12:02 IST2019-06-24T12:02:30+5:302019-06-24T12:02:35+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहरातील शाहदुल्ला नगर भागात महिलेला शिवीगाळ करत तिघांनी विनयभंग केल्याची घटना 13 जून रोजी ...

Molestation of woman by threatening and threatening | शिवीगाळ करुन धमकी देऊन महिलेचा विनयभंग

शिवीगाळ करुन धमकी देऊन महिलेचा विनयभंग

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शहरातील शाहदुल्ला नगर भागात महिलेला शिवीगाळ करत तिघांनी विनयभंग केल्याची घटना 13 जून रोजी सायंकाळी घडली होती़ याप्रकरणी शनिवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला़ 
करण चौफुली परिसरातील  सासर तर नवनाथ टेकडी परिसरातील शाहदुल्ला नगरातील माहेर असलेल्या महिलेने न्यायालयात खावटीसाठी अर्ज दाखल केला आह़े या अर्जानुसार कामकाज सुरु असताना 13 जून रोजी मोहसीन फिरोज पठाण, सफियान सलीम पठाण, फिरोज युसूफ पठाण सर्व रा़ करण चौफुली परिसर यांनी महिलेच्या माहेरी जावून शिवीगाळ केली़ यादरम्यान तिघांनी पिडितेला जमिनीवर पाडून तिची ओढणी ताणून विनयभंग केला़ याप्रकरणी पिडितने आई-वडीलांसोबत विचारविनिमय करुन शनिवारी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली़ यानुसार मोहसीन पठाण, सफियान पठाण, फिरोज पठाण यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े तपास पोलीस नाईक येलवे करत आहेत़ 
 

Web Title: Molestation of woman by threatening and threatening