मुलांच्या भांडणाच्या रागातून नंदुरबारात महिलेचा विनयभंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2018 12:02 IST2018-06-27T12:01:58+5:302018-06-27T12:02:13+5:30

Molestation of woman in Nandurbar in anger of children | मुलांच्या भांडणाच्या रागातून नंदुरबारात महिलेचा विनयभंग

मुलांच्या भांडणाच्या रागातून नंदुरबारात महिलेचा विनयभंग

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : मुलांच्या भांडणाचा वादातून चौघांनी महिलेस मारहाण करून घरातील सामानाची नासधूस केल्याची घटना शहरातील सोन्या मारुती मंदीराजवळ घडली. चौघांविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोन्या मारुती मंदीराजवळ राहणा:या एका 50 वर्षीय महिलेच्या मुलाची भांडण भुरू नज्जू शेख यांच्या मुलाशी झाली होती. त्या वादातून भुरू नज्जू शेख, इल्लू नज्जू शेख, सलीम शेख व आणखी एकजण असे चौघे महिलेच्या घरात घुसले. त्यांनी 50 वर्षीय महिलेशी अलि हरकत करून बेदम मारहाण केली. 
तसेच लाठय़ा, काठय़ांनी घरातील लाईट फोडून धान्याचे पोते फाडून नुकसान केले. त्यात घरातील सामानाचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले. 
याबाबत महिलेने शहर पोलिसात फिर्याद दिल्याने भुरू नज्जू शेख,    इल्लू नज्जू शेख व इतर दोघांविरुद्ध शहर पोलिसात विनयभंग व मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार चव्हाण करीत आहे. संशयीतास लवकरच ताब्यात घेण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title: Molestation of woman in Nandurbar in anger of children